तामिळनाडू – केरळला अतिवृष्टीचा इशारा
उत्तर भारत थंडीच्या विळख्यात असताना, दक्षिणेकडील राज्ये, विशेषत: तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अपेक्षित आहे. भारतीय हवामान खात्याने तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस अपेक्षित आहे….
वादळ आणि पाऊसमुळे ब्राझीलमध्ये आपत्तीजनक स्थिती निर्माण
ब्राझीलच्या दक्षिण भागावर गेल्या काही दिवसांपासून भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. जोरदार वाऱ्यांसह आलेल्या या वादळामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. आकाश काळवंडले, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला आणि काही मिनिटांत संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. अनेक घरांची छप्परे उडाली, झाडे…
दिल्लीतील हवा गुणवत्ता गंभीर श्रेणीत – आरोग्याला धोका
राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषण पुन्हा एकदा अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत घसरली असून, दिल्ली सध्या देशातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक बनली आहे. प्रदूषणाचा वाढता आकडा आणि शहराच्या भौतिक वातावरणावर झालेला परिणाम चिंताजनक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळच्या नोंदीनुसार, दिल्लीचा हवा गुणवत्ता…
शांततेचा प्रयत्न फसला – इस्तंबूलमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान चर्चेचा शेवट निष्फळ
इस्तंबूल येथे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या आठवड्यात झालेल्या चार दिवसांच्या शांतता चर्चेचा शेवट कोणत्याही ठोस निर्णयाविना झाला. दोन्ही देशांमधील सीमावाद, दहशतवादी कारवाया आणि व्यापार सुरक्षेच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली, मात्र परस्पर अविश्वास आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे बैठकीतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. या चर्चेला तुर्की आणि…
पंतप्रधान मोदींनी चार नवीन वंदे भारत गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
भारतीय रेल्वेने देशांतर्गत प्रवासाचा अनुभव अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक बनवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील त्यांच्या संसदीय मतदारसंघातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन झाले. यामध्ये लखनऊ – सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेसचा…
चीनचे तिसरे विमानवाहक जहाज फुजियान नौदलात दाखल
चीनने आपल्या नौदल सामर्थ्यात आणखी एक भर घातली आहे. देशाचे तिसरे आणि सर्वात प्रगत विमानवाहक मोठे जहाज ‘फुजियान’ आता अधिकृतपणे नौदलाच्या ताफ्यात सामील झाले आहे. बीजिंगमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत या जहाजाचा ताबा नौदलाकडे अधिकृतपणे सोपवण्यात आला. या घटनेमुळे चीनने केवळ…
उत्तर भारतात थंडीची लाट – हवामान विभागाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतातील राज्यांसाठी पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचे इशारे आणि सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्क राहणे आवश्यक आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, वायव्य भारतासह अनेक भागांमध्ये किमान तापमानाचा पारा खूप खाली घसरला आहे. उत्तर आणि मध्य भारतात सध्या थंडीची…
सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या श्वानांचे पुनर्वसन करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष देत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि महामार्ग यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या भटक्या श्वानांना तात्काळ हटवून त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रशासनांना दिले आहेत. अलीकडच्या…
दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना अमेरिकेत व्हिसा बंदी – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एक मोठा झटका दिला आहे. नव्याने जारी केलेल्या स्थलांतर धोरणानुसार मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि इतर दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त व्यक्तींना आता अमेरिकेचा व्हिसा मिळवताना कठोर अटींचा सामना करावा लागणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सर्व दूतावास आणि…
डिसेंबरपासून संसदेत हिवाळी अधिवेशनाची सुरूवात – देशाचे लक्ष पुन्हा दिल्लीकडे
देशाच्या लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा 1 डिसेंबरपासून सुरू होऊन 19 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याचे केंद्रीय संसदीय व्यवहार राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अधिवेशनाच्या तारखांना अधिकृत मंजुरी दिली असून, परिस्थितीनुसार वेळापत्रकात आवश्यक बदल करण्याचा…
भारतासाठी रशियाने जाहीर केली कच्च्या तेलावर सूट
आंतरराष्ट्रीय इंधन उत्पादन बाजारात भारतासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध घालण्यात आले होते. याचा थेट परिणाम रशियन तेलाच्या खरेदीवर दिसून आला, मात्र भारताने या परिस्थितीत आपले आर्थिक धोरण ठाम ठेवले आणि रशियाने भारतासाठी कच्च्या तेलावर…
आठवा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर कार्यपद्धतीत बदल
केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग अखेर मंजूर केला असून, देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आनंदवार्ता ठरली आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मदतीसाठी पुलक घोष आणि पंकज जैन हे दोन सचिव म्हणून कार्य…
स्वदेशी तेजस लढाऊ विमानांना अमेरिकन शक्तीचा हातभार
भारताने स्वदेशी बनावटीच्या तेजस मार्क-एक ए लढाऊ विमानांसाठी अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक कंपनीकडून एकशे तेरा इंजिन खरेदी करण्याचा करार केला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि अमेरिकन कंपनी यांच्यात झालेला हा करार भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ घडवून आणणार आहे. या इंजिनांचा वापर भारतीय हवाई दलाच्या…
ब्रिटिशकालीन जमीन कायदे बदलण्याची वेळ – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
भारतात आजही ब्रिटिशकालीन अनेक कायदे अस्तित्वात आहेत, विशेषतः जमीन व्यवहारांबाबतचे नियम आणि अधिनियम अजूनही जुन्याच पद्धतीने लागू आहेत. यामुळे मालमत्तेचे व्यवहार गुंतागुंतीचे, वेळखाऊ आणि अनेकदा विवादास कारणीभूत ठरतात. सर्वोच्च न्यायालयाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत केंद्र सरकारला आणि कायदा आयोगाला सखोल अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले…
दिल्ली विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे शेकडो उड्डाणे उशीराने
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळपासून उड्डाणांच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला. हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक विमानांचे उड्डाण आणि विमान धावपट्टीवर उतरण्यात उशिर झाला. यामुळे प्रवाशांना बरेच तास प्रतीक्षा करावी लागली. सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास दिल्ली हवाई वाहतूक नियंत्रण…
न्यूयॉर्कमध्ये उच्च उत्पन्नावर अतिरिक्त कर लागू होणार
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात नव्याने निवडून आलेले महापौर झोहरान ममदानी यांनी संपत्तीवर कर वाढवण्याचा प्रस्ताव मांडल्याने मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या मतानुसार, शहरातील श्रीमंत नागरिकांनी आणि मोठ्या उद्योगांनी समाजाच्या विकासासाठी अधिक योगदान द्यावे. यासाठी त्यांनी “संपत्तीकर” लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ममदानी यांनी सुचवले आहे की…
उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट – हिमालयन राज्यांमध्ये मुसळधार बर्फवृष्टी
उत्तर भारतात हिवाळ्याची चाहूल आता स्पष्ट जाणवू लागली आहे. जम्मू–काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या दोन–तीन दिवसांत प्रचंड बर्फवृष्टी झाली असून, अनेक पर्वतीय भाग पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या थराने झाकले गेले आहेत. बर्फवृष्टीसोबतच तापमानात अचानक घट झाली असून, सकाळ–संध्याकाळचा गारवा अधिक तीव्र झाला आहे. जम्मू–काश्मीरमधील गुलमर्ग,…
भारताच्या तेल व्यवहारावरून जागतिक राजकारणात नवी खळबळ
एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा व्यक्त केला आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी जवळजवळ थांबवली आहे. या विधानामुळे ऊर्जा धोरण व आंतरराष्ट्रीय संबंध या दोन्ही अभिमुखतेने चर्चेत आले आहेत….
वंदे भारत स्लीपर ट्रेन एकशे ऐंशी किमी वेगाने धावली – यशस्वी चाचणी
भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागमधील कोटा प्रभागामध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनची ताशी एकशे ऐंशी किमी वेगाने धावली. या प्रवासादरम्यान लोको पायलटच्या डेस्कवरील पाणीदेखील सांडले नाही. ही पूर्णपणे स्वयंचलित ट्रेन आहे. त्यामुळे ही चाचणी यशस्वी ठरली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची सवाई माधोपूर-कोटा-नागदा मार्गावर चाचणी…
पाकिस्तानमध्ये सैन्यशक्ती वाढली – लोकशाहीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
इस्लामाबादमध्ये पाकिस्तान सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे देशातील सैन्यप्रमुखांना आणखी अधिकार मिळणार आहेत. या निर्णयामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानमधील लोकशाही व्यवस्थेच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारने केलेल्या या नव्या सुधारणेनुसार, सैन्यप्रमुखांना संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित धोरणांमध्ये थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. या सुधारणांमुळे…
सार्वजनिक ठिकाणांवरून भटके कुत्रे हटवण्याचे न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस डेपो आणि रेल्वे स्थानके या ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याची आदेश दिले आहे. तसेच, नसबंदी केल्यानंतरही अशा कुत्र्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा आदेश नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…
निसार सात नोव्हेंबरपासून कार्यरत – आपत्ती व्यवस्थापनात मिळणार मदत
इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त मोहिमेतील निसार उपग्रह सात नोव्हेंबरला कार्यान्वित होईल. निसारमध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हा उपग्रह नैसर्गिक आपत्तीची आगाऊ माहिती प्रदान करेल. यामुळे आपल्याला बरीच मदत मिळेल. ३० जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून…
अमेरिकेची अण्वस्त्र मिसाईल – मिनिटमॅन तीनची यशस्वी चाचणी
अमेरिकेच्या हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राईक कमांडने कॅलिफोर्नियातील व्हॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून निशस्त्र मिनिटमॅन-तीन इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. हे क्षेपणास्त्र सुमारे चार हजार दोनशे मैलांचे अंतर पार करत मार्शल द्वीपसमूहाजवळील रोनाल्ड रीगन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डिफेन्स टेस्ट साइट येथे लक्ष्यावर उतरले. या प्रक्षेपणाद्वारे अमेरिकेच्या क्षेपणास्त्र…
जागतिक क्रमवारीत भारतीय शैक्षणिक संस्थांची घसरण
लंडनमधील क्वाक्वेरेली सायमंड्सम्हणजेच क्यूएस यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आशियाई विद्यापीठांच्या क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. या यादीत भारतातील फक्त सात संस्थाच स्थान मिळवू शकल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतातील प्रमुख संस्थांच्या क्रमवारीमध्ये खासकरुन आयआयटीच्या क्रमवारीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आयआयटी दिल्ली आणि…
भारताच्या निर्यातबंदीने बांगलादेशात कांद्याच्या दरात मोठी वाढ
भारतातून कांद्याची निर्यात अचानक थांबवण्यात आल्याने शेजारील बांगलादेशात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात झपाट्याने वाढ होत असून, सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. भारत हा बांगलादेशाला सर्वाधिक कांदा पुरवठा करणारा देश असल्याने निर्यातबंदीचा सर्वाधिक फटका या देशाला बसला आहे. भारताने देशांतर्गत…