कोर्लई बीच
कोर्लई बीच हे मुंबईच्या लपलेल्या रत्नांपैकी एक आहे. अलिबाग शहरापासून थोड्या अंतरावर कोर्लईच्या लहान मच्छीमार गावात मुख्य समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्राच्या नेहमीच्या वाळूच्या किनाऱ्याच्या उलट, पावसाळ्यात हिरव्या-पिवळ्या तणांनी, गुलाबी ऑक्सॅलिस फुलांनी आणि गवताळ कुरणांनी भरलेला हा किनारा. गरम उन्हाळ्यात आणि अत्यंत हिवाळ्यात, तथापि, मखमली आवरणाशिवाय समुद्रकिनारा…

प्रबळगड किल्ला
प्रबळगड किल्ला महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात असे आणखी दुर्गम किल्ले आहेत. जिथे कथा पर्यटकांना रोमांचित करतात. हा किल्ला माथेरान आणि पनवेल दरम्यान आहे. त्याच्या संरचनेमुळे आणि उंचीमुळे, याला भारतातील सर्वात उंच आणि सर्वात धोकादायक किल्ला म्हटले जाते. जुने किल्ले आणि वास्तू पाहणाऱ्या लोकांमध्ये हा किल्ला नेहमीच…

लवासा
महाराष्ट्रात स्थित, लवासा हे भारतातील नवीन हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे शहर पोर्टोफिनो या इटालियन शहरावर आधारित एक सुंदर प्रकल्प आहे. लवासा 7 टेकड्यांवर पसरलेले आहे आणि 25000 एकर क्षेत्र व्यापलेले आहे. लवासा हे सौंदर्य आणि पायाभूत सुविधांचे एक आदर्श मिश्रण आहे जे पर्यटकांना…
श्री क्षेत्र कपिलधार
बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र कपिलधार हे एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. कपीलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. या समाधीला 459 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे क्षेत्र वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान आहे.येथील धबधबा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हा धबधबा ‘कपिलधार धबधबा’ म्हणूनच ओळखला जातो. तुलसीविवाहाच्या वेळी येथे…

कोलवा किनारा
कोलवा हे गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक किनारपट्टीचे गाव आहे. हा किनारा साधारणपणे सुमारे 2.5 किमी आहे.या गावात आज पोर्तुगीजकालीन उच्चभ्रू घरे आणि आधुनिक व्हिला आहेत. येथे 300 वर्षांहून अधिक काळातील अनेक अवशेष पहायला मिळतात. आठवड्याच्या शेवटी येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. जगभरातील तसेच भारतीय…

गडगडा किल्ला
नाशिकपासून साधारणपणे १८ किलोमीटर अंतरावर ‘गडगड सांगवी’ हे एक गाव आहे. या गावाच्या मागे ‘अंबोली पर्वत’ नावाने प्रसिद्ध असणारी डोंगररांग आहे. या पर्वतरांगेत तीन शिखरांनी डोके वर काढलेले दिसते. उजवीकडील शिखर ‘अंबोली‘ व डावीकडील शिखर ‘अघोरी’ या नावाने ओळखले जात असून या दोन शिखरांमध्ये ‘गडगडा…

आजा पर्वत
बालाघाट रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध ‘आजा पर्वत’ उर्फ ‘आजोबाचा डोंगर’ आहे. ठाणे जिल्ह्यातील हा गड हरिशचंद्र अभयारण्याचा भाग आहे. येथे घनदाट अरण्याचे दर्शन घडते. येथे वाल्मिकी आश्रम असल्यामुळे या भागाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. गडाच्या नावाला एक इतिहास आहे. असे म्हणतात की, या गडावर…

भद्र मारुती मंदिर
छत्रपती संभाजीनगरजवळील खुल्ताबाद येथे भद्र मारुती हे एक प्राचीन मंदिर आहे. वेरुळ लेण्यांपासून चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. येथील मारूती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. प्रयागराज येथील मंदिर आणि मध्य प्रदेशातील ‘जाम…

वागातोर समुद्रकिनारा
वागातोर हा एक गोव्यातील गजबजलेला किनारी भाग आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या सुंदरतेसाठी ओळखला जातो. हा किनारा मेजवान्यांसाठी प्रसिद्ध आहे. तरुण लोक या मेजवान्यांना हजेरी लावतात. येथील ‘सी व्ह्यू बार’ आणि क्लबमधून सूर्यास्त पाहण्यासाठी लोक येथे उपस्थित राहतात. येथील रेस्टॉरंटमध्ये जगभरातील पाककृती आढळतात.वागातोर किनाऱ्यावर अनेक क्रियाकलाप…

कुंजरगड किल्ला
बालाघाट डोंगररांगेवर ‘कुंजरगड’ हा एक किल्ला आहे. पायथ्याशी असलेल्या गावातून हा गड हत्तीसारखा प्रचंड दिसतो. या किल्याशीचे दुसरे नाव ‘कोंबडगड’ असेही आहे. पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस पडतो. पावसाळा ऐन भरात असताना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा…

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे एक उल्लेखनीय ठिकाण आहे. मुख्य आकर्षणांपैकी हे एक स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापासून नेहरू बाल उद्यान जवळ आहे. हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. मराठा साम्राज्यातील शासकांची शस्त्रे आणि इतर पुरातन…

दाक्षायणी देवीचे मंदिर
औरंगाबादमध्ये दाक्षायणी देवीचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर लासूर गावात ‘शिवना’ नदीच्या काठावर असून निसर्गरम्य आहे. दाक्षायणी देवी लासुर गावचे आराध्य दैवत व वैजापुर तालुक्याचे ग्रामदैवत आहे. डोक्यावर चांदीचा मुकूट आणि अंगभर दागिने परिधान केलेली देवीची मूर्ती प्रसन्न आहे. देवीच्या मंदिरासमोर मोठा सभामंडप आहे. देवीच्या…

बेनाळी समुद्रकिनारा
बेनाळी हा गोव्यातील एक सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा खूप शांत आणि नयनरम्य असा आहे. संध्याकाळच्या वेळी येथे गर्दी असते. पर्यटक सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात. या किनाऱ्यावर गोव्यातील इतर समुद्रकिनाऱ्यांइतके पर्यटक नसतात. तरीही विविध प्रकारच्या जलक्रीडा पाहण्याची संधी येथे मिळते. या किनाऱ्यावर…

इंद्राई किल्ला
नाशिक जिल्ह्यात अजंठा-सातमाळ रांगेत चांदवड तालुक्यात राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड हे चार किल्ले आहेत. इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव राजधेरवाडी आहे. या गावात २ दिवस थांबून राजधेर व इंद्राई हे किल्ले पाहता येतात. किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत. या किल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. इंद्राई…

हिमायत बाग
छत्रपती संभाजीनगरच्या रौजा बाग परिसरात दिल्ली गेटजवळ हिमायत बाग हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. ही बाग १७ व्या शतकातील असून 300 एकर परिसरात पसरलेली आहे. येथे आता फळ संशोधन केंद्र आणि रोपवाटिका असून ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचा एक भाग आहे. पूर्वी या…

गोगाबाबा मंदिर
छत्रपती संभाजीनगरमधील गोगा बाबा टेकडी ही एक छोटी टेकडी आहे. या टेकडीवर एक छोटेसे गोगाबाबा मंदिर आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण असून मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. येथील वातावरण नेहमीच शांत व आल्हाददायक असते. या टेकडीवरून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य प्रेक्षणीय असते. गोगा बाबा टेकडीच्या माथ्यावर…

बांबोळी समुद्रकिनारा
बांबोळी समुद्रकिनारा हा गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. सहलीचा किंवा शांत दिवसाचा आनंद लुटणाऱ्यांनी या किनाऱ्यावर जावे. गोव्यात विखुरलेल्या बहुतेक समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे या किनाऱ्यावर विक्रेते किंवा शॅक दिसणार नाहीत. या किनाऱ्यावर नारळाची झाडे, खडकाळ भाग आणि सोनेरी वाळूचा लांब पट्टा दिसतो. या किनाऱ्यावर…

पदरगड किल्ला
कर्जतमार्गे भिमाशंकरला जाणाऱ्या गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला रायगड जिल्ह्यात येतो. टेहळणी करणे हा या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता. पदरगडावरील दोन कातळ सुळक्यांना औरंगजेबाने पेठचा किल्ला घेताना आजूबाजूचे किल्लेही घेतले. त्यावेळी पदरगड त्याने पुन्हा बांधून घेतल्याचे सांगतात. पदरगडावर चढताना ‘चिमणी…

सोनेरी महाल
छत्रपती संभाजीनगर शहरात सोनेरी महाल ही एक देखणी व ऐतिहासिक वास्तू आहे. ही वास्तू सातमाळा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. येथून जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.सोनेरी महालाच्या परिसरात झाडे, कुरणे आणि शेत…

राजूरचे गणेश मंदिर
जालना शहरातील राजूर परिसरात एक देखणे गणेश मंदिर आहे. शहरापासून पंचवीस किंमी अंतरावर हे मंदिर आहे. गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तसेच विनायकी चतुर्थीदिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून येथे परिवहन महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध असतात. गणेश पुराणानुसार, हे स्थळ भगवान गणेशाच्या संपूर्ण पिठांपैकी…

मोबोर किनारा
गोव्यातील मोबोर सागरकिनारा हा पर्यटनासाठीचे एक आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे बरेच उत्सव आणि उपक्रम नेहमीच चालू असतात. निसर्गप्रेमींसाठी हे गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी हे एक आहे. फुललेल्या लिली, वाळूचे ढिगारे अशी सुंदर नैसर्गिक वैशिष्ट्ये येथे पहायला मिळतात. ज्या लोकांना गोव्याचे दैनंदिन जीवन संपूर्णपणे अनुभवायचे आहे, किंवा…

सिध्दगड किल्ला
प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरणारा माल जुन्नर या बाजारपेठेत नेण्यासाठी विविध व्यापारी मार्गांचा वापर होत होता. यातील कल्याण – म्हसा – अहुपे घाट – जुन्नर हा एक मार्ग होता. हा व्यापारी मार्ग आणि अहुपे घाटावर नजर ठेवण्यासाठी सिध्दगड या किल्ल्याची निर्मिती केली होती. ठाणे जिल्ह्यातील…

वृंदावन मनोरंजन उद्यान
चाकूरमधील वृंदावन मनोरंजन उद्यान हे आबालवृद्धांचे आवडते ठिकाण आहे. लातूरच्या मुख्य शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. पर्यटकांसाठी थेट उद्यानापर्यंत जाणाऱ्या अनेक कॅब आणि टॅक्सी सेवा येथे आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित बसगाड्याही येथे उपलब्ध असतात. चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या केंद्राजवळ हे पार्क…

केशव बालाजी देवस्थान
लातुरमधील औसा तालुक्यात केशव बालाजी देवस्थान आहे. आंध्रप्रदेशातील तिरुमलाच्या धर्तीवर हे मंदिर उभारले असून मंदिराला भव्य सभामंडप आहे. वैविध्यपूर्ण बांधकाम आहे. शहराच्या वर्दळीपासून दूर टेकडीवर निसर्गम्य वातावरणात हे मंदिर आहे. वर्षातून दोनवेळा येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. हे मंदिर सर्व दिवस सकाळी 6 वा.पासून रात्री…

बेताळभाटी किनारा
बेताळभाटी किनारा हा कोलवा आणि माजोर्डा या किनाऱ्यादरम्यान आहे. पर्यटकांमध्ये हा ‘सनसेट बीच’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सूर्यास्ताची चित्तथरारक दृश्ये दिसतात. बेताळभाटी किनाऱ्याला भेट देण्यामागचे दुसरे कारण म्हणजे येथे डॉल्फिन पहायला मिळतात. येथे गेल्यावर स्थानिक मच्छिमारांना सुंदर डॉल्फिन स्पॉटिंगसाठी घेऊन जाण्याची विनंती केल्यास ते तुम्हाला…