पीयूष गोयल स्पेन दौऱ्यावर
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तेरा ते सतरा जुलै दरम्यान स्पेन, बेल्जियम आणि फिनलंड या तीन युरोपीय देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जात आहेत. भारताचे युरोपीय महासंघासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करणे आणि प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला गती देणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे….