चीनमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत
उत्तर चीनमधील मंगोलिया स्वायत्त प्रदेश आणि हेलोंगजिआंग प्रांताला तीव्र वादळाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे आणि पडलेल्या गारांमुळे येथील स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांमध्ये गारा पडल्या. यामुळे रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या अनपेक्षित हवामान बदलामुळे…