जपानला वादळाचा तडाखा
जपानच्या दक्षिण-पश्चिम भागात जांगमी नावाच्या तीव्र उष्णकटिबंधीय वादळाने धुमाकूळ घातला आहे. या वादळामुळे क्युशू बेटावरील तब्बल साठ हजार घरांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वादळाचा मुख्य तडाखा ओकिनावा आणि कागोशिमा या प्रांतांना बसला. वीज वाहिन्या तुटल्याने हजारो नागरिकांना अंधारात रात्र…