फिलिपिन्समध्ये शक्तिशाली भूकंप
फिलिपिन्स देशाच्या दक्षिणेकडील मिंडानाओ बेटावर सोमवारी सकाळी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. सात वाजून सदतीस मिनिटांनी सात दशांश आठ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने या परिसराला हादरवून सोडले. भूकंपाचा केंद्रबिंदू सारंगानी प्रांतातील मासिम शहराच्या पश्चिमेला समुद्रात सुमारे तेहतीस किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे धक्के एवढे तीव्र होते…