तुकाराम महाराजांच्या पालखीचे जुलैला प्रस्थान
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा या पायी पालखी सोहळ्याचे तीनशे एकेचाळीसावे वर्ष आहे. पालखी सात जुलै रोजी देहू नगरीतील मुख्य देऊळवाड्यातून टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान करेल. प्रस्थानाच्या पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम देहू येथील इनामदार वाड्यात असेल. त्यानंतर आठ जुलैला…