
चॅट जीपीटीमुळे काम सुलभ होऊ लागले आहे. एआय चॅटबॉट्स वेगवेगळ्या कामात मदत करत असल्यामुळे अर्थातच मनुष्य खूश आहे. तथापि, ही सुविधा शाळा, महाविद्यालये यांच्यासाठी एक मोठी कोंडी ठरत आहे. एआय कंटेंटमुळे साहित्य चोरीची भीती आहे. हे ओळखून आता चॅट जीपीटीवरील साहित्य ओळखण्यासाठी एका कंपनीने विशिष्ट साधन आणले आहे. हे साधन ओपन एआयकडे उपलब्ध आहे. पॅन एआय या कंपनीने हे टूल बनविले असून त्याबाबत माहिती दिली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, ओपन एआयमध्ये एक अशी प्रणाली आहे, ज्याच्या मदतीने चॅटजीपीटीच्या मदतीने तयार केलेला कंटेंट शोधला जाऊ शकतो. परंतु कंपनीने हे साधन अजून बाजारात आणलेले नाही. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांचे गृहपाठ पूर्ण करण्यासाठी जीपीटीचा वापर करतात. यामुळे शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांची स्वत:चीही फसवणूक होत आहे. ओपनएआयच्या नव्या वॉटरमार्किंग प्रणालीद्वारे ही समस्या दूर केली जाऊ शकते.