महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेती आणि पूरक व्यवसायांना प्रोत्साहन
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेती आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नैसर्गिक शेती, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कणा असलेल्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढवणे, ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणे आणि शेतीला निसर्गाशी जोडून अधिक शाश्वत बनवणे, हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सुमारे पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून पूर्णपणे निसर्गावर आधारित शेती पद्धतीचा अवलंब केल्यास, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल, असे मत शासनाने व्यक्त केले आहे.
दुग्धव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी पशुपालन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, पशुधनासाठी अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि एकूण दूध उत्पादन वाढवण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी आणि महिलांना या जोडव्यवसायातून अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळावे, या हेतूने विशेष प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि थेट आर्थिक मदतीच्या योजना प्राधान्याने सुरू करण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी राज्यातील विविध तलाव, धरणे आणि मोठ्या जलाशयांचा विकास करून मत्स्य उत्पादन वाढविण्याचा व्यापक कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्याच्या चालू अर्थसंकल्पात केवळ शेतीच नव्हे, तर तिला आधार देणाऱ्या सर्व पूरक व्यवसायांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
अजित पवार यांची आठवण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. त्यांनी सुरुवातीलाच अजित पवार यांना स्मरून त्यांच्या स्मारकाची घोषणा देखील केली. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी एकूण ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या आर्थिक शिस्तीमुळेच राज्याची स्थिती स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही अजितदादांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात व्यक्त केल्या.
महाराष्ट्रातील अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
1. महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार आहे.
२. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे. ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडली. दोन हजार चारशे पन्नास किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून तेवीस हजार पूलांचं काम हाती घेतलं आहे.
३. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा हा सहभाग असेल. यात पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे. तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत एक कोटी एकतीस लाख फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.
४. प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार आहोत. पन्नास लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर बसवणार, बांबू विकास प्रकल्प वाढवणार, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे.
५. मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु, पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
६. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार आहोत. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहोत.
९. मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात एक हजार दोनशे किमीचे मेट्रो मार्ग उभारणार आहोत. सहा हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार. 2029 पर्यंत एकशेपासष्ट किमी मेट्रो मार्गिका तयार करणार आहोत. ८. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.