पिठाचे स्वादिष्ट लाडू

साहित्य : गव्हाचे पीठ – एक कप, देशी तूप – एक कप, पिठीसाखर – कप, सुका मेवा – अर्धा कप, वेलची पावडर अर्धा लहान चमचा.

कृती : पिठाची पिन्नी बनविण्यासाठी प्रथम एका कढईत देशी तूप टाकावे. मध्यम आचेवर गरम करावे. आता त्यात पीठ घालावे. आणि सतत ढवळत रहावे. पिठाचा रंग सोनेरी झाला आणि छान वास येऊ लागला म्हणजे ते खरपूस भाजल्याचे समजावे. पीठ थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर घालावी. यानंतर त्यामध्ये सुका मेवा घालून छान मिसळावे. हाताला थोडे तूप लावून लाडू बांधायला सुरुवात करावी. स्वादिष्ट पिठाचे लाडू तयार आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
13,603 वेळा पाहिलं