बेनाळी समुद्रकिनारा

बेनाळी हा गोव्यातील एक सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा खूप शांत आणि नयनरम्य असा आहे. संध्याकाळच्या वेळी येथे गर्दी असते. पर्यटक सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात. या किनाऱ्यावर गोव्यातील इतर समुद्रकिनाऱ्यांइतके पर्यटक नसतात. तरीही विविध प्रकारच्या जलक्रीडा पाहण्याची संधी येथे मिळते. या किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार पहायला मिळतात. हा मंत्रमुग्ध करणारा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर चंदेरी वाळू पहायला मिळते. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेला हा किनारा आराम करण्यासाठी, उत्साह निर्माण करण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे.

एकंदरीत, आनंद घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी या बेनोळी किनाऱ्याला भेट द्यावी. येथील सूर्यास्ताचे निरीक्षण करावे. जलक्रीडांचा आनंद घ्यावा. रात्रीच्या वेळी हा समुद्रकिनारा खूप सुंदर दिसतो. विविध प्रकारच्या बीच, शॅक्स आणि रेस्टॉरंट्सनी भरलेला आहे. येथे संगीत आणि नृत्याने आपण आपली रात्र मनोरंजक बनवू शकता. मोठ्या आवाजातील संगीताचा आनंद घेऊ शकता, मेजवान्या करु शकता. जर तुम्ही गोव्याची राजधानी पणजी येथे असाल, तर या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. या प्रवासासाठी तुम्हाला 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. विमानाने जात असाल, तर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टॅक्सी भाड्याने घ्यावी. हे अंतर फक्त 31 किलोमीटर आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
22,672 वेळा पाहिलं