किहिम सागरकिनारा
रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ असणारा किहिम सागरकिनारा नितांतसुंदर आहे. या किनाऱ्यावरील पांढरी वाळू आणि उन्हात चमकणाऱ्या पाण्याच्या लाटा पुढचे अनेक दिवस मनात रुंजी घालत राहतात. किनाऱ्यावरील डोलणारी नारळाची झाडे मनाला फार आनंद देतात. हा किनारा तरुण, वृद्ध, दांपत्य, कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी या सर्व वयोगटांसाठी मोठे आकर्षण…

सोनगीर किल्ला
महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यामध्ये ‘सोनगीर’ किल्ला आहे. मुघल सुभेदार अहमद फारुकी याने आपल्या शासन काळात दुसरा किल्ला बांधला. मध्ययुगीन काळात या किल्ल्यास फार महत्त्व होते. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक 3 म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच हा किल्ला आहे. येथे जाण्यासाठी धुळे…

वेंगुर्ला बंदर
वेंगुर्ला’ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारे एक शहर आहे. काजू, आंबा, नारळ आणि विविध प्रकारच्या झाडांनी या शहराची शोभा वाढते. वेंगुर्ला हे एक बंदर आहे. या बंदरावर नेहमी वर्दळ असते. वेंगुर्ला बंदरावरून विशाल समुद्राचे मनोहारी दर्शन होते. येथे वाळूवरून चालण्याचा आनंद घेता येत नाही; पण…

श्री क्षेत्र गाणगापूर
सोलापूर जिल्ह्यात गाणगापूर हे दत्तगुरुंचे पवित्र स्थान आहे. ‘भीमा’ आणि ‘अमरजा’ या नद्यांच्या संगमाकाठी हे सुंदर मंदिर आहे. येथे दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य होते. हे एक जागृत स्थान असून अनेक भक्तांचे व्याधी आणि बाधा निवारण केले जाते. येथे नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. ‘गाणगापूरग्रामी…

भाट्ये समुद्रकिनारा
रत्नागिरी शहरापासून अवघ्या 1 किमी अंतरावर असणारा भाट्ये समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावरील संध्याकाळ पर्यटकांनी गजबजलेली असते. नैसर्गिक सौंदर्याने भारलेला हा सरळ समुद्रकिनारा अंदाजे 1.5 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे किनाऱ्यावरून दूरवर चालत जाण्याचा आनंद आपण घेऊ शकता. या समुद्रकिनाऱ्यावरून, आपण भाट्ये किनाऱ्याच्या पुढे प्रसिद्ध ‘मांडवी’…

अलंग किल्ला
अलंग किल्ला हा अलंगगड म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला पश्चिम घाट आणि कळसूबाई पर्वत रांगेत असलेला एक किल्ला आहे. अलंग किल्ला, मदनगड किल्ला, कुलंग किल्ला आणि त्यांना जोडणारा ट्रेक अलंग, मदन आणि कुलंग म्हणून ओळखला जातो. अलंग किल्ला हा येथील सर्वात कठीण ठिकाणांपैकी एक म्हणून…

महाराष्ट्र निसर्ग उद्यान
मुलांना सुट्टी लागली की दर आठवड्याला कुठेतरी बाहेर फिरायला न्यावंच लागतं. मुंबईतील निसर्गाच्या सानिध्यात असलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ होय. ३७ एकरांच्या कचऱ्याच्या ढीगाऱ्याखालील जमिनीचे परिवर्तन या निसर्ग उद्यानात करण्यात आलेले आहे. १९९४ पासून या रुपांतरणास सुरुवात झाली आणि आज धारावीच्या जवळ आपल्याला…

दापोलीचे दत्तमंदिर
दापोली तालुक्यात हर्णे-मुरुड-कर्दे असा प्रवास करत बुरोंडी-कोळथरेच्या दिशेने निघालो , वाटेत किनाऱ्यापाशी लागणारे गाव म्हणजे ‘लाडघर’. किनाऱ्यावरील मातीत असलेल्या विविध धातूंच्या गुणधर्मामुळे इथल्या पाण्याला तांबूस रंग आहे. त्यामुळे या पाण्याला ‘तामसतीर्थ’ असे म्हणतात. हा भाग पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. कर्दे गावातून समुद्राला लागून असलेल्या मार्गाने…

शिरोडा समुद्रकिनारा
मुंबई आणि गोव्यातील समुद्रकिनारे फार वर्दळीचे वाटत असतील तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात शिरोडा किनारा हा एक शांत आणि आरामदायी समुद्रकिनारा आहे. येथे खाद्यपदार्थ, रिसॉर्ट्स, जलक्रीडा इत्यादी सुविधादेखील आहेत.शिरोडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. वेंगुर्ला शहरापासून ते काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक साज…

रायरेश्वर किल्ला
महाराष्ट्रात उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये रायरेश्वर हे प्रसिद्ध पठार आहे. ११ किमी. लांब आणि १.५ किमी. रुंद पसरलेले हे पठार आहे. हा किल्ला पुण्याहून ८५ किमी. अंतरावर, तर भोरवरून ३० किमी. अंतरावर आहे. खाजगी वाहनाने किंवा एस. टी. ने आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू…

कोयना वन्यजीव अभयारण्य
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात मध्यभागी कोयना वन्यजीव अभयारण्य आहे. घनदाट अशा हिरव्यागार जंगलात ते वसलेले आहे. भारत सरकारने सन 1985 मध्ये या संरक्षित वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.पश्चिम घाटामध्ये मुबलक पाण्याचा प्रवाह आणि समृद्ध वनस्पतींमध्ये असणारे हे अभयारण्य मन सुखावणारे आहे. संपूर्ण अभयारण्य 423 चौ.मी….

कंकालेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले आहे. ‘बिंदुसरा’ नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने दहाव्या ते 11 व्या शतकात हे मंदिर बांधले. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. या…

तारकर्ली समुद्रकिनारा
तारकर्ली समुद्रकिनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सर्वोत्तम कोकण किनारा आहे. येथील समुद्राचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. समुद्रकिनारासुद्धा मस्त मोकळा आणि स्वच्छ आहे. येथे ‘स्नॉर्कलिंग’ आणि ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद लुटण्यासाठी आवर्जून पर्यटक येतात. पांढरी वाळू आणि स्वच्छ निळे पाणी, डॉल्फिन, कर्ली नदीचे रमणीय दृश्य डोळ्यांनी टिपता…

पेडका किल्ला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘कन्नड’ तालुक्यात ‘पेडका’ हा एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी ‘पेडकावाडी’ धरण आहे. या धरणाच्या मातीच्या बांधावरून चालत गेल्यावर ‘पेडका’ किल्ल्याचा पायथा गाठता येतो. साधारणपणे ३० मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथून आपल्याला उत्तर आणि दक्षिण बाजूला डोंगरांचे 2 सुळके दिसतात. यांच्यामधील घळीतून…

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ
‘तोरणमाळ’ हे भारतातील नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे. अतिदुर्गम भागात असल्याने आणि जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते. उंची आणि भौगोलिक वातावरणाने येथील…

कोल्हापूरचे रेणुका मंदिर
महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये प्रसिध्द रेणुका मंदिर असून हे मंदिर कोल्हापूर बस स्थानकापासून १० मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे रेणुकादेवी, मातंग देवी आणि परशुराम अशी देवस्थाने आहेत. रेणुका देवीला ‘ओढ्यावरची यल्लमा’ असेदेखील म्हणतात. कर्नाटकातील बेळगाव येथील सौंदत्ती हे तिचे मुख्य स्थान आहे. ही देवता कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश…

आचरा समुद्रकिनारा
समुद्रातील डॉल्फिन पाहणे, सूर्यस्नान करणे आणि पोहणे आवडत असेल, तर सिंधुदुर्गातील आचरा समुद्रकिनाऱ्यावर जावे. हा किनारा मालवण तालुक्यात असून मालवणपासून अंदाजे 22 किलोमीटर अंतरावर आहे. जलप्रेमींना आकर्षित करणारे डॉल्फिन येथे मोठ्या संख्येने येतात. जलचर प्रजातींव्यतिरिक्त येथे विविध प्रजातींचे पक्षीसुद्धा आढळतात. जलक्रीडा करणारे पर्यटक आचरा किनाऱ्यावर…

कोल्हापूरमधील गगनगड
महाराष्ट्राचे ‘चेरापूंजी’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘गगनबावडा’ गावात ‘गगनगड’ उभा आहे. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नाथपंथीय गैबीनाथांचे हे मूळ स्थान आहे. १९ व्या शतकात गगनगिरी…

कार्ला लेणी
लोणावळ्याच्या जवळील कार्ला या गावाजवळ ‘कार्ला लेण्या’ आहेत. या लेण्या लोणावळ्यापासून 11 किमी अंतरावर आहेत. ‘भाजा लेणी’, ‘पाटण बौद्ध लेणी’, ‘बेडसे लेणी’ आणि ‘नाशिक लेणी’ या लेण्यादेखील या भागात पाहण्यास मिळतात. या ठिकाणी ‘एकवीरा देवी’चे देवस्थान आहे. या लेण्या इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इ.स. 5…

रेडीचा स्वयंभू द्विभूज श्री गणेश
सिंधुदुर्ग हा तळकोकणातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची समृद्धी या जिल्ह्यास लाभली आहे. जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात रेडी हे असेच लोकप्रिय गाव आहे. लोहखनिजांच्या खाणींनी संपन्न असलेल्या या गावाचा लौकिक येथील स्वयंभू द्विभूज श्री गणेश मंदिरामुळे वाढला आहे. रेडीच्या या देवस्थानातील श्री…

आवास समुद्रकिनारा
अलिबागमधील आवास समुद्रकिनारा हा सर्वात कमी गर्दीचा आहे. येथे संपूर्ण शांतता आणि निर्मळता अनुभवता येते. शहरी जीवनातील त्रासापासून हा किनारा दूर आहे. जर तुम्ही गर्दीत जाणे टाळत असाल तर हे एक अप्रतिम ठिकाण आहे. येथे मनसोक्त फिरू शकता. सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. आवास समुद्रकिनारा अजूनही…

मल्हारगड (सोनोरी)
महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणार्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही…

पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय
महाराष्ट्रातील पुणे शहरात कात्रज येथे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आहे. पुणे महानगरपालिकेने पर्वती पायथ्याजवळ सन १९५३ मध्ये ‘पेशवे पार्क’ची स्थापना केली. येथे पूर्वी पेशव्यांचे स्वत:चे प्राणिसंग्रहालय होते. अवघ्या ७ एकर जागेत बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये पर्यटकांना प्राणी पाहता येत असत. केवळ लोकांचे मनोरंजन हा याचा एकमात्र उद्देश होता.सन…

देवगडमधील श्री देव रामेश्वर मंदिर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला एक तालुका आहे. अत्यंत निसर्गरम्य असा हा भाग पर्यटकांच्या मनात भरणारा असाच आहे. तालुक्यातील ‘वेळगिवे’ या गावात श्री देव रामेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. कुणकेश्वर मंदिरासारखेच लेणे असलेले श्री रामेश्वर देव मंदिर हे एक जागृत…

खवणे सागरकिनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरापासून जवळ खवणे समुद्रकिनारा हा एक स्वच्छ, निळाशार समुद्रकिनारा आहे. हा किनारा डोंगराळ प्रदेशाने वेढलेला आहे. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आणि नारळाच्या झाडांचा सुंदर मिलाफ हे या किनाऱ्याचे खास आकर्षण आहे. हा समुद्रकिनारा मात्र अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे. ज्यांना मनासाठी एकांत आणि…