हरमल समुद्रकिनारा
हरमल समुद्रकिनारा हा उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. सुट्टीच्या दिवशी या किनाऱ्यांवर वर्दळ असते. समुद्रकिनाऱ्यावर एक वेगळे शांत वातावरण आहे. हा गोव्यातील एके काळी लोकप्रिय ‘हिप्पी’ किनारा होता. हरमल हा सफेदशुभ्र असा वाळूचा समुद्रकिनारा आहे. येथे खडकदेखील आहेत, हा गोव्यातील सर्वात सुंदर किनारा…
बल्लाळ गड
महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर बल्लाळगड हा एक डोंगरी किल्ला आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात मुंबई – अहमदाबाद महामार्गानजीक हा किल्ला आहे. हा किल्ला पायथ्यापासून ५०० मीटर उंचीवर आहे. या भागात असणाऱ्या सेगवा, असावा, अशेरीगड या इतर किल्ल्यांच्या मानाने बल्लाळगडाची उंची पायथ्याच्या काजळी गावापासून कमी असल्याने…
शनिवारवाडा
पुण्यातील पेशव्यांचा शनिवारवाडा आजही दिमाखात असून लोकप्रिय आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही वास्तू असून हे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. पहिले बाजीराव पेशवे यांनी १० जानेवारी, १७३० साली या वास्तुची पायाभरणी केली. सन् १७५८ मध्ये या वाड्यात सुमारे १०० लोक राहत होते. नोव्हेंबर १८१७ मध्ये शनिवारवाडा…
पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर
पुण्यातील अनेक धार्मिक वास्तू प्राचीन असून प्रेक्षणीय आहेत. त्या पाहण्यासाठी येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. असेच एक टेकडीवर विसावलेले चतु:श्रृंगी देवीचे मंदिर आहे. पुणे शहरातील श्री चतु:श्रृंगी देवी ही पार्वतीचा अवतार असलेल्या श्री दुर्गादेवीचे रुप मानले जाते. हे मंदिर पुण्यातील सेनापती बापट मार्गावर आहे. चतु:श्रृंगी…
उनभाट सागरकिनारा
उनभाट सागरकिनारा हा कोकणातील एक लहानसा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा हिरवेगर्द डोंगर आणि स्वच्छ निळ्या पाण्याने वेढलेला आहे. येथे पर्यटकांची गर्दी किंवा गोंगाट नसतो. उनभाट किनारा हा पोहण्यासाठी, सूर्यस्नान करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. जवळच काही लहान रेस्टॉरंट्स आणि कॅफे देखील आहेत. जर…
तारापूरचा किल्ला
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर तालुक्यात तारापूर हा एक नयनरम्य ऐतिहासिक किल्ला आहे. आता किल्ल्यावर अवशेष शिल्लक आहेत. परंतु येथून आजूबाजूचा परिसर फार मनमोहक दिसतो. या किल्यायाचे मुंबईपासूनचे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. हा किल्ला सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. पोर्तुगीजांच्या काळात हा किल्ला ‘सॅंटो एस्टेव्होचा…
सुधागड अभयारण्य
पुण्यापासून साधारण 135 कि.मी अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुधागड अभयारण्य वसलेले आहे. येथे असलेल्या सुधागड या गडावरुन हे नाव देण्यात आले आहे. गडाच्या सभोवतालचे 76.88 चौ.कि.मी. क्षेत्र सन 2014 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. सुधागडच्या या परिसरात दाट वनश्री आहे. सुधागड परिसरात हजारो वर्षांपूर्वीची ठाणाळे…
पंढरपुरजवळील विष्णूपद मंदिर
पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास ‘विष्णूपद’ म्हणून ओळखले जाते. युगानुयुगे कर कटेवर ठेऊन विटेवर उभा असलेला विठूराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील या विष्णूपद मंदिरात विश्रांतीसाठी वास्तव्यास असतो. यावेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. गोपाळपूर जवळील नदीपात्रात ‘पुष्पावती’…
आश्वे समुद्रकिनारा
आश्वे समुद्रकिनारा हा उत्तर गोव्यातील एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. राजधानी पणजीच्या उत्तरेला असलेला हा समुद्रकिनारा नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे. उत्तर गोव्यातील आश्वे समुद्रकिनारा ‘शापोरा’ नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यापासून तेरेखोल नदीजवळील केरी समुद्रकिनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. हा समुद्रकिनारा राजधानी पणजीपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. उत्तर गोव्यातील सर्वात…
हरगड किल्ला
नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर गावात गेल्यावर हरगड दिसतो. मुल्हेर गावातून तीन किल्ले दिसतात. समोर मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडे हरगड किल्ला दिसतो. हरगडाचा माथा प्रशस्त आहे. गडावर प्रवेश करताना लागणाऱ्या सगळ्या दरवाजांची आता पडझड झालेली आहे. दरवाजा असल्याच्या खुणा तेवढ्या तेथे अस्विाावा त आहेत. शेवटच्या दरवाजाने…
साताऱ्यातील ठोसेघर धबधबा
पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्यावर डोंगरांच्या उंच कपारीतून जमिनीच्या दिशेने झेपावणारे सफेदशुभ्र धबधबे दिसतात. अर्थातच, धबधब्यांचे आकर्षण प्रत्येकाला असते. धबधब्यांखाली मनमुराद आंघोळ करण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत, जे माणसांची गर्दी खेचून आणतात. पावसाळी पर्यटन हंगामात या धबधब्यांवर गर्दी होते. कास…
कोल्हापुरचा कणेरी मठ
देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीचे वास्तव्य असलेले करवीरनगरी अर्थात कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक देखणे पर्यटनस्थळ आहे. हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर असून भोवताली सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिंक आहे. या कोल्हापूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर ‘कणेरी’ हे…
चिंचणी सागरकिनारा
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये गजबजलेल्या जीवनापासून शांतता प्रदान करणारा नयनरम्य असा चिंचणी सागरकिनारा आहे. तारापूर तालुक्यातील हा समुद्रकिनारा सोनेरी वाळू आणि स्वच्छ निळ्याशार पाण्यासाठी ओळखला जातो. हा समुद्रकिनारा हिरवाईने वेढलेला आहे. येथे आभाळास भिडू पाहणारी नारळाची झाडे आहेत. चिंचणी किनारा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.हा किनारा…
कलावंतीण दुर्ग किल्ला
महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ ‘कलावंतीण’ हा डोंगरमाथ्यावर बांधलेला टेहळणी गड आहे. समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर उंचीवर हा गड असून वर चढण्यासाठी १६००० पायऱ्या आहेत. गडाच्या पायथ्याशी चढण असून पुढे पठारासारखा मोकळा भाग असून त्याला ‘प्रबळमाची’ असे म्हणतात. या माचीवर काही आदिवासी आणि ठाकर बांधवांची वस्ती…
जांभूळ बेट
कोणतीही नदी तसेच समुद्रातील बेटे मुळातच नितांतसुंदर असतात. दूरवरुन निळ्याशार पाण्यात पाहताना ही बेटे जणू काही छानपैकी विहार करीत असलेली भासतात. देशभरातील अशी काही बेटे आहेत, जी पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जातात. असेच महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात फार सुंदर बेट आहे. हे बेट ‘जांभूळ बेट’ या नावाने…
संत जनाबाईंची समाधी
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात श्री विठ्ठलाची परमभक्त संत जनाबाईंचे समाधीस्थान आहे. अनेक भाविकांची पावले यादिशेने वळतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरीच्या काठावर हे सुंदर समाधी मंदिर आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड हा एक तालुका आहे. गोदावरीच्या तीरावर शांतपणे विसावलेला हा तालुका म्हणजे संत जनाबाईचे जन्मस्थान आहे….
दांडी समुद्रकिनारा
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पालघर या शहरापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर दांडी सागरकिनारा आहे. पालघर येथून दांडी किनाऱ्यावर जाण्यासाठी स्थानिक कॅब किंवा ऑटो-रिक्षा भाड्याने घेऊ शकता, दांडी किनारा फार सुंदर आहे. येथील सोनेरी वाळू आणि अप्रतिम हिरवाई लक्षवेधी आहे. दांडी किनारपट्टीवर लांबपर्यंत चालण्याचा अनुभव घेता येतो….
दौलताबाद किल्ला
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद किल्ला हे एक आश्चर्यच मानले जाते. ह्याला औरंगाबादमध्ये ‘औरंगाबाद किल्ला’ असेही म्हटले जाते. या किल्ल्याचे पहिले नाव दौलताबाद नसून ‘देवगिरी’ असे होते. महंमद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी किल्ल्यावर स्थलांतरित केली. त्यावेळी त्याने देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’…
सहस्त्रकुंड धबधबा
महाराष्ट्राचा भुगोल अभ्यासताना सहस्रकुंड धबधबा वाचनात येतोच. नांदेड जिल्ह्यातील धबधब्यांपैकी पर्यटकांची गर्दी खेचून आणणारा हा एक धबधबा आहे. पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे. या धबधब्यांना भेट द्यायची झाल्यास पर्यटक माहूर येथील रेणुकादेवी मंदिर, दत्त शिखर, अनुसया मातेचे मंदिर पाहू शकतात. पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात…
माणकेश्वर मंदिर
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देखणी व अप्रतिम शिवमंदिरे आहेत. काही शिवमंदिरे तर प्राचीन असून ती उत्तम कलाकृतीचे दर्शन घडवितात. धाराशिवमध्ये असेच एक माणकेश्वर हे एक सुंदर शिवमंदिर आहे. शिव दर्शनाबरोबरच मुद्दामहून हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. या जिल्ह्यातील भूम तालुक्यात हे मंदिर असून मंदिराचे कोरीवकाम…
कोंडुरा किनारा
ज्येष्ठ साहित्यिक आरती प्रभू यांच्या लेखणीने अजरामर केलेला शांत, सुखद समुद्रकिनारा म्हणजे सिंधुदुर्गातील कोंडुरा किनारा आहे. वेंगुर्ला तालुक्यात माडांच्या सावलीत अलगद विसावलेला हा किनारा म्हणजे निसर्गरम्यतेची मस्त अनुभूती आहे. हा किनारा वेंगुर्ला तालुक्यात आहे. या किनाऱ्यावर पांढरीशुभ्र वाळू, आणि अजस्त्र लाटांनी अणकुचीदार झालेले मोठे- मोठे…
कंधारचा किल्ला
महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी कंधारचा किल्ला एक आहे. नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यात हा किल्ला आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास, सुरुवातीला राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात केल्याचे समजते. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. पुढील काळात हा किल्ला जिंकणारे राजे या किल्ल्याच्या बांधकामात भर…
येलदरी धरण
परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी महत्व्णपूर्ण असणारे येलदरी धरण हे पर्यटकांसाठी एक मनमोहक ठिकाण आहे. हे धरण पूर्णा नदीवर बांधले आहे. पूर्णा ही गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे. महत्वाचे म्हणजे या धरणामुळे परभणी, जिंतूर, वसमत व हिंगोली जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटला आहे. या धरणाजवळ पर्यटकांसाठी दोन…
परभणीतील पारदेश्वर मंदिर
परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध शिवशंकरांचे मंदिर आहे. हे मंदिर संगमरवरी आहे. श्री स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरातील शिवलिंगास बारा ज्योतिर्लिंगाचे महत्व आहे. परभणीतील नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्वर महाविद्यालयासमोर हे ठिकाण आहे. शिवपुराणामध्ये भगवान महादेव…
तोंडवली-तळाशील किनारा
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सागरकिनाऱ्यावर विसावलेला एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गडकिल्ले, जलदुर्ग तसेच अप्रतिम आणि सुबक अशी पुरातन मंदिरे आहेत. अशा या सौंदर्यसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेला तोंडवली-तळाशील किनारा अप्रतिम आहे. येथे डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य आणि…