कोलकात्यात पावसाचा हाहाकार
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात रविवारी अवघ्या दीड तासात ६१.९ मिलीमीटर मुसळधार पाऊस कोसळल्याने महानगरातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, वाहतूक ठप्प झाली आणि काही सखल भागांतील पदपथांवर गुडघाभर पाणी साचले. पुढील चोवीस तासांतही विजांसह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असल्याने प्रशासनाला…