धरणांमध्ये आठ टक्के साठा
जून महिन्याचे वीसहून अधिक दिवस उलटूनही मुख्य पाऊस सक्रिय न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमधील एकत्रित जलसाठा अवघ्या ८.६८ टक्क्यांवर आला आहे. उर्ध्व वैतरणा धरणाचा सर्वसाधारण साठा शून्यावर आल्याने महानगरपालिकेने राखीव कोट्यातील पाणी वापरण्यास सुरुवात केली असून, धरण क्षेत्रात तातडीने पाऊस न झाल्यास…