ऑक्टोबरमध्ये तापमान वाढ
हवामान विभागाने ऑक्टोबर ते डिसेंबर या मान्सूनोत्तर काळाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा ऑक्टोबर महिन्यात देशातील बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. यासोबतच ऑक्टोबर महिन्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उष्णता जाणवण्याची शक्यता असून…