तिबेटमध्ये भीषण भूकंप
तिबेटमध्ये तीव्र भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण प्रदेश हादरला आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.० इतकी मोजली गेली. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. सोळाशेहून अधिक लष्करी जवान प्रत्यक्ष मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. शेकडो घरे आणि पशूंचे गोठे पत्त्याच्या महलाप्रमाणे कोसळले आहेत….