केरळचे ओलन

साहित्य : कोहळा- 1 मध्यम, भोपळ्याचे तुकडे – 1 कप, हिरव्या मिरच्या – 6, नारळाचे दूध – 1 कप, शिजवलेली लाल चवळी – पाव कप, वालाचे दाणे, कढीपत्ता, मीठ, खोबरेल तेल – 3 चमचे.

कृती : लाल चवळीत मीठ घालून मऊ शिजवून घ्यावी. त्यात कोहळ्याचे तुकडे, वालाचे दाणे, भोपळ्याचे तुकडे आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. थोडे ढवळून त्यात पाणी घालावे. आता या भांड्यावर झाकण ठेवून पाच मिनिटांपर्यंत शिजू द्यावे. हे झाकण काढून हळुवार ढवळून त्यात मीठ आणि कढीपत्ता घालावा. एक उकळी आली की यात नारळाचे दूध घालून चांगले मिसळावे. थोडे तेल घालून पुन्हा ढवळावे. ‘ओलन’ खाण्यासाठी तयार आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
10,896 वेळा पाहिलं