शिवमंदिरासाठी भव्य विकास आराखडा
अंबरनाथ येथील प्राचीन शिलाहारकालीन शिवमंदिर परिसराचा काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर कायापालट करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. “रुद्र पुनर्कल्पना” या नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत संपूर्ण मंदिर परिसराचा कायापालट करण्याचे नियोजन आखले गेले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन केले जात…