गडनदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणाची पाणी पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर पोहोचली आहे. या पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीकाठच्या गावांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत….