श्रावणात व्हीआयपी दर्शन बंद
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात होणारी भाविकांची प्रचंड गर्दी आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने व्हीआयपी दर्शनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येत्या १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे (व्हीआयपी) दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे….