मालेगावमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद
संपूर्ण महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा तीव्र झाला आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मालेगाव शहरात राज्यातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे आणि हवेतील आर्द्रता घटल्यामुळे राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पारा ३५ अंशांच्या पुढे गेला असून नागरिक उकाड्याने बेजार झाले…