धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला
राज्यभरातील धरणांनी तळ गाठला आहे. वाढलेल्या तापमानामुळे धरणांतील उपयुक्त पाणीसाठा चोवीस तासांत कमालीचा खालावला आहे. तो केवळ सव्वीस पूर्णांक अकरा टक्के इतका खाली घसरला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. राज्यातील तीन हजार अठ्ठावीस धरणांमध्ये मिळून हा एवढा साठा उरला आहे….