किमान वेतनावर न्यायालयाचा निर्णय
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य स्वयंसेवकांना किमान वेतन मिळण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. महानगरपालिकेने सहाय्यक कामगार आयुक्तांच्या ७ सप्टेंबर २०२० रोजीच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. ३८ वर्षे सुरू असणारा आरोग्य उपक्रम ५ तास रोजच्या कामाची ठराविक वेळ…