विदर्भातील महामार्गांच्या कामाला गती
विदर्भातील दळणवळण व्यवस्था आणि पायाभूत सुविधांना नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. विदर्भातील चार मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांसाठी एमएसआरडीसी प्रशासनाने तब्बल १० हजार ३४४ कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. नवीन वर्षात या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आखण्यात आले…