सिंधुदुर्ग जिल्हा घरगणनेत प्रथम
राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डीजिटल माध्यमातून शंभर टक्के जनगणना करणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जिल्ह्याने हा बहुमान मिळवला आहे. यासोबतच या जिल्ह्याने राज्याच्या इतर भागांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे….