तापमानवाढीचा मिठउद्योगाला फायदा
मीरा-भाईंदर परिसरात यंदाच्या उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्यामुळे मिठउत्पादनाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तीव्र उष्णतेमुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे जलद बाष्पीभवन होत असून, मिठनिर्मितीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होत आहे. त्यामुळे यंदा मिठाचे उत्पादन मागील वर्षांच्या तुलनेत अधिक होण्याची शक्यता मिठागार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मिठागारांमध्ये वाढलेली…