संत जनाबाईंची समाधी
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात श्री विठ्ठलाची परमभक्त संत जनाबाईंचे समाधीस्थान आहे. अनेक भाविकांची पावले यादिशेने वळतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरीच्या काठावर हे सुंदर समाधी मंदिर आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड हा एक तालुका आहे. गोदावरीच्या तीरावर शांतपणे विसावलेला हा तालुका म्हणजे संत जनाबाईचे जन्मस्थान आहे….

दांडी समुद्रकिनारा
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पालघर या शहरापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर दांडी सागरकिनारा आहे. पालघर येथून दांडी किनाऱ्यावर जाण्यासाठी स्थानिक कॅब किंवा ऑटो-रिक्षा भाड्याने घेऊ शकता, दांडी किनारा फार सुंदर आहे. येथील सोनेरी वाळू आणि अप्रतिम हिरवाई लक्षवेधी आहे. दांडी किनारपट्टीवर लांबपर्यंत चालण्याचा अनुभव घेता येतो….

दौलताबाद किल्ला
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद किल्ला हे एक आश्चर्यच मानले जाते. ह्याला औरंगाबादमध्ये ‘औरंगाबाद किल्ला’ असेही म्हटले जाते. या किल्ल्याचे पहिले नाव दौलताबाद नसून ‘देवगिरी’ असे होते. महंमद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी किल्ल्यावर स्थलांतरित केली. त्यावेळी त्याने देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’…

सहस्त्रकुंड धबधबा
महाराष्ट्राचा भुगोल अभ्यासताना सहस्रकुंड धबधबा वाचनात येतोच. नांदेड जिल्ह्यातील धबधब्यांपैकी पर्यटकांची गर्दी खेचून आणणारा हा एक धबधबा आहे. पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे. या धबधब्यांना भेट द्यायची झाल्यास पर्यटक माहूर येथील रेणुकादेवी मंदिर, दत्त शिखर, अनुसया मातेचे मंदिर पाहू शकतात. पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात…

माणकेश्वर मंदिर
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देखणी व अप्रतिम शिवमंदिरे आहेत. काही शिवमंदिरे तर प्राचीन असून ती उत्तम कलाकृतीचे दर्शन घडवितात. धाराशिवमध्ये असेच एक माणकेश्वर हे एक सुंदर शिवमंदिर आहे. शिव दर्शनाबरोबरच मुद्दामहून हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. या जिल्ह्यातील भूम तालुक्यात हे मंदिर असून मंदिराचे कोरीवकाम…

कोंडुरा किनारा
ज्येष्ठ साहित्यिक आरती प्रभू यांच्या लेखणीने अजरामर केलेला शांत, सुखद समुद्रकिनारा म्हणजे सिंधुदुर्गातील कोंडुरा किनारा आहे. वेंगुर्ला तालुक्यात माडांच्या सावलीत अलगद विसावलेला हा किनारा म्हणजे निसर्गरम्यतेची मस्त अनुभूती आहे. हा किनारा वेंगुर्ला तालुक्यात आहे. या किनाऱ्यावर पांढरीशुभ्र वाळू, आणि अजस्त्र लाटांनी अणकुचीदार झालेले मोठे- मोठे…

कंधारचा किल्ला
महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी कंधारचा किल्ला एक आहे. नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यात हा किल्ला आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास, सुरुवातीला राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात केल्याचे समजते. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. पुढील काळात हा किल्ला जिंकणारे राजे या किल्ल्याच्या बांधकामात भर…

येलदरी धरण
परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी महत्व्णपूर्ण असणारे येलदरी धरण हे पर्यटकांसाठी एक मनमोहक ठिकाण आहे. हे धरण पूर्णा नदीवर बांधले आहे. पूर्णा ही गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे. महत्वाचे म्हणजे या धरणामुळे परभणी, जिंतूर, वसमत व हिंगोली जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटला आहे. या धरणाजवळ पर्यटकांसाठी दोन…

परभणीतील पारदेश्वर मंदिर
परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध शिवशंकरांचे मंदिर आहे. हे मंदिर संगमरवरी आहे. श्री स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरातील शिवलिंगास बारा ज्योतिर्लिंगाचे महत्व आहे. परभणीतील नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्वर महाविद्यालयासमोर हे ठिकाण आहे. शिवपुराणामध्ये भगवान महादेव…

तोंडवली-तळाशील किनारा
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सागरकिनाऱ्यावर विसावलेला एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गडकिल्ले, जलदुर्ग तसेच अप्रतिम आणि सुबक अशी पुरातन मंदिरे आहेत. अशा या सौंदर्यसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेला तोंडवली-तळाशील किनारा अप्रतिम आहे. येथे डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य आणि…

नळदुर्ग किल्ला
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे. हा भुईकोट किल्ला आहे. विलक्षण सौंदर्य असलेला हा किल्ला अप्रतिम आहे.तो पाहण्यासाठी पर्यटकांची फार गर्दी दिसते. किल्ल्याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरली असून तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याचा…

रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय
संग्रहालये ही इतिहासाची सर्वंकष माहिती देणारी जिवंत दालनेच असतात, असे म्हणायला हरकत नाही ! या संग्रहालयांना इतिहासप्रेमी पर्यटक आवर्जून भेट देत असतात. देशासह विदेशातील संग्रहालये पाहणारे पर्यटकही अनेक आहेत. इतिहास जागविण्यासाठी संग्रहालये असणे गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे ऐतिहासिक रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय आहे. या…

चारठाणातील मंदिरे
महाराष्ट्राच्या अनेक भागांमधील मंदिरांची वास्तुरचना खरोखरच डोळे दिपविणारी अशी आहे. परभणीतील जिंतूर तालुक्यात अशी काही सुंदर मंदिरे पहायला मिळतात. त्यात चारठाणा गावाचा उल्लेख करता येईल. येथे अनेक मंदिरे असून ती पुरातन असल्याने पाहण्यासाठी पर्यटकही आवर्जून जातात. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती आहे. चारठाणा हे एक लोकप्रिय…

आगोंद समुद्रकिनारा
आगोंद समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. ज्यांना किनाऱ्यावरील शांततापूर्ण वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल, गर्दी, गडबड-गोंगाटापासून दूर वेळ घालवायचा असेल अशा पर्यटकांसाठी हे चांगले ठिकाण आहे. गोव्यातील हा समुद्रकिनारा जवळजवळ दोन मैलांपर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर उत्कृष्ट खाद्यपदार्थ आणि पेये मिळतात….

औसा किल्ला
महाराष्ट्रातील गडकिल्ले हे राज्याचे वैभव आहे. असाच एक भुईकोट किल्ला लातूरमध्ये औसा शहराच्या बाजूला आहे. हा किल्ला औसा किल्ला म्हणून ओळखला जातो. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याने वजीर असताना हा किल्ला बांधला. अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही. किल्ल्यातील काही वास्तू व…

हत्ती बेट
‘हत्ती बेट’ नावाचे निसर्गरम्य ठिकाण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. प्राचीन काळापासून या स्थळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. उदगीर या प्रसिद्ध शहरापासून साधारण पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावर आहे. हत्ती बेटावर पुरातन मंदिरे, गुहा व कोरीव शिल्पे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. या बेटास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे….

उस्मानाबादमधील सिद्धक्षेत्र कुंथलगिरी
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात सिद्धक्षेत्र कुंथलगिरी हे एक धार्मिक क्षेत्र आहे. कुंथलगिरी हे ठिकाण उस्मानाबाद येथून सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर ६० किमी अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी बस तसेच खासगी वाहनांची सोय आहे. हा परिसर कुलभूषण व देशभूषण या मुनिवरांचे मोक्षस्थान समजला जातो. याठिकाणी श्री शांतीसागर महाराजांची…

आश्वे-मांद्रे किनारे
उत्तर गोव्यातील आश्वे आणि मांद्रे सागरकिनारे देशी-विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. आश्वे किनारा हा उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्याचा एक मोठा भाग आहे. हा भाग मोरजी किनाऱ्यापासून पुढे सुरू होतो. आश्वे, मांद्रेनंतर पुढे हरमल किनाऱ्याकडे जातो. आश्वे हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. याच्या मागील बाजूस सुंदर पामची झाडे आहेत….

अंतूरगड किल्ला
उत्तुंग मजबूत गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या किल्ल्यांनी जवळपास अवघा महाराष्ट्र व्यापला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या रांगेवर अंतुरगड आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली हा किल्ला आहे. अंतूरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यातील एक मार्ग कन्नडकडून गौताळा अभयारण्यामधून जातो….

संजीवनी बेट
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एक लोकप्रिय हिरवीगर्द टेकडी आहे. हे एक जैवसमृद्ध असे क्षेत्र आहे. ‘वडवळ नागनाथ’ गावाजवळ असलेली ही टेकडी तिच्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे ‘संजीवनी बेट’ म्हणून ओळखली जाते. हे ठिकाण चाकूरपासून १६ किमी अंतरावर असून लातूर शहरापासून ३९ किमी अंतरावर आहे. संजीवनी बेटास ‘वडवळ नागनाथ बेट’…

यमाई देवी मंदिर
साताऱ्यापासून ४४ किमी आणि पाचगणीपासून ६३ किमी अंतरावर, यमाई देवी मंदिर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील औंध येथे डोंगरमाथ्यावर वसलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात खूप पूजनीय आहे आणि सातारा येथे भेट देण्याच्या शीर्षस्थानांपैकी एक आहे. यमाई देवी ही अनेक महाराष्ट्रीय कुटुंबांची कुलदैवत आहे….

बागा समुद्रकिनारा
बागा समुद्रकिनारा हा गोव्यातील सर्वात आनंददायक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे जलक्रीडा, उत्तम जेवणाची रेस्टॉरंट्स, बार आणि क्लब आढळतात. बागा किनारा हा कळंगुट आणि अंजुणा सागरकिनाऱ्यांच्या सीमेवर आहे. जलक्रीडा हे बागा किनाऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे. पॅरासेलिंग, वेकबोर्डिंग, विंडसर्फिंग, काइट सर्फिंग, जेट स्कीइंग हे काही जलक्रीडा प्रकार…

धारूर किल्ला
बीड जिल्ह्यातील धारूर येथे राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी ‘महादुर्ग’ नावाचा किल्ला बांधण्यात आला. याला धारूर किल्ला असे नाव आहे. त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली. त्यामुळे आजही किल्ला व त्यातील अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत. येथे किल्ल्याबरोबरच अंबेजोगाईचे मंदिर, लेणी,…

धाराशिव लेणीसमूह
लेणी हा कोणत्याही भागाचा एक ऐतिहासिक ठेवा असतो. त्या लेण्या संबंधित भागातील सांस्कृतिक समृद्धी वाढवितात. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात आकर्षक एक प्राचीन लेणीसमूह आहे. येथील शैव लेणी धाराशिवपासून ५ कि.मी. अंतरावर असून त्यांना ‘चांभार लेणी’ असेही म्हणतात. या लेण्यांसमोर एक देखणे शिव मंदिर आहे. या लेण्यांकडे…

जाळीचा देव
जालना जिल्ह्यात अजिंठ्यापासून २८ किलोमीटर आणि बुलढाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभावपंथीयांचे ‘जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथामधील भाविकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे श्री चक्रधरस्वामी ही काळ वास्तव्यास होते. औरंगाबादपासून जाळीचादेव अंतर १२१ किमी आहे. जळगावपासून जाळीचा देव अंतर ९३ किमी आहे….