फळांचे आईस्क्रीम
उष्ण वातावरणात नेहमीच थंड पाणी, थंड पेय आणि आईस्क्रीमची गरज भासते. तर, काही रसाळ फळे वापरून घरीच स्वादिष्ट आइस्क्रीम बनवायचे कसे? होय, आम्ही अशाच काही फळांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही स्वादिष्ट आइस्क्रीम तयार करू शकता. चला या यादीवर एक नजर टाकूया.आंबा- उष्णकटिबंधीय चवीसाठी…
चॉकलेट उद्योग
‘चॉकलेट’ हा शब्द ऐकताच खाण्याच्या इच्छेने तोंडाला लगेच पाणी सुटते. हा एक जिभेवर चघळला जाणारा गोड पदार्थ आहे. अनेक नवीन स्टार्टअप्ससह चॉकलेट व्यवसाय उदयास येत आहे. भारतातील चॉकलेट निर्मिती व्यवसायाची वाढ, नफा, उपयोग समजून घेऊया. चॉकलेट बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी चॉकलेट उत्पादन प्रशिक्षणाद्वारे चॉकलेट कसे…
कापडापासून चटई
लोक सर्वसाधारणपणे जुने तसेच शिलाईतून उसवलेले कपडे टाकून देतात. परंतु या कपड्यांपासून दरवाजावरील पायपुसणी आकर्षकपणे बनविता येतात. या पायपुसण्यांना बाजारातही चांगला दर मिळतो. ग्राहक आवडीने विकत घेतात. टाकाऊ कापडापासून पायपुसणी बनविण्याचा व्यवसाय अलिकडे महिला करू लागल्या आहेत. यासाठी प्रथम कापड पट्ट्यामध्ये कापून घेतले जाते. ती…
लाल बटाट्याची शेती
आता शेतकरी पारंपरिक शेती सोडत आहेत. पिकांच्या विविध जातींचा अवलंब करणे. आता विविध क्षेत्रात शेतीचे अनेक प्रयोग केले जात आहेत. पूर्वी शेतकरी गहू, मका आणि धानाची लागवड करत असत. त्यामुळे आता त्यात आणखी पिकांची भर पडली आहे. आता शेतकरीही लाल बटाट्याच्या लागवडीचा आनंद घेत आहेत. यामध्ये…
मुलांमधील नैराश्य पळवा
सध्या झपाट्याने बदलणारी जीवनशैली लोकांना अनेक समस्यांना बळी पाडत आहे. वाढत्या कामाचा ताण आणि इतर समस्यांमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्याही लोकांना सतावत आहेत. नैराश्य ही अशीच यापैकी एक समस्या आहे. यामुळे आजकाल बरेचजण प्रभावित झाले आहेत. लहान मुलेही या दिवसांत नैराश्याची बळी ठरत…
जिभेची स्वच्छताही हवीच
अन्नपदार्थाचा स्वाद ओळखणारी जीभ मुळात गुलाबी रंगाची असते. ती तोंडाच्या आतील अवयव असली तरीही तोंड उघडताच ती दिसते. ती स्वच्छ असेल तर व्यक्तीच्या वेहऱ्याच्या सौंदर्यात भरच पडते. म्हणून जिभेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायलाच हवे. बरेच लोक दररोज दात घासणे ही तोंडाची स्वच्छता मानतात, परंतु ब्रश करण्याबरोबरच…
सीताफळ आरोग्यासाठी लाभदायक
सीताफळ हे एक गोड फळ आहे. ते लोह, कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, जीवनसत्व ‘सी’ आणि जीवनसत्व ‘बी’ समृद्ध आहे. हृदय निरोगी ठेवण्यासोबतच ते मधुमेहापासून आराम देण्यासही मदत करते. याशिवाय बदलत्या ऋतूमध्ये होणाऱ्या ॲलर्जीच्या समस्येवरही याचे सेवन फायदेशीर ठरते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही सीताफळ उपयुक्त आहे….
धान्यांची इडली
साहित्य : बाजरीचे पीठ – अर्धा कप, नाचणीचे पीठ – अर्धा कप, गव्हाचे पीठ – अर्धा कप, ज्वारीचे पीठ – अर्धा कप, उडीद डाळ – अर्धा कप, मेथी दाणे- 2 लहान चमचे, मीठ – 1 लहान चमचा. कृती : धान्यांची इडली बनविण्यासाठी प्रथम मेथी दाणे…
प्रशंसा आणि खुशामत
स्तुती ऐकणे कोणाला आवडत नाही ! काही लोक प्रशंसा ऐकल्यानंतर अधिक सक्रीय आणि उत्साही वाटतात, परंतु काही लोकांसाठी ही समस्या बनू शकते. यासाठी प्रशंसा आणि खुशामतीतीत फरक समजून घ्यायला हवा. ॲमस्टरडॅम विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक ब्रुमेलमन म्हणतात, ‘स्तुतीमुळे काही लोकांमध्ये तणाव आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते….
नैसर्गिक फेशियल
चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढविण्यासाठी फेशियल हा एक चांगला पर्याय आहे. महिन्यातून एकदा तरी फेशियल करणे त्वचेसाठी खूप चांगले असते. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. त्वचा चमकदार दिसते. तथापि, ‘पार्लर फेशियल’ खिशाला खूप भारी पडते. तसेच रसायनांच्या वापरामुळे त्वचेवर ॲलर्जीही होऊ शकते. म्हणूनच, घरच्या घरी…
आरोग्यदायी पनीर
पनीर आजकाल लोकांच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. बर्गर, पिझ्झा, सँडविच अशा अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. आजकाल लोकांना त्याची चव इतकी आवडू लागली आहे की जवळजवळ प्रत्येक पदार्थामध्ये त्याचा वापर केला जातो. चविष्ट असण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. याचे अनेक…
दही कारले
साहित्य : एक कारले, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, आले, चार हिरव्या मिरच्या, हिंग, जिरे,अर्धा लहान चमचा धणे, हळद, अर्धा लहान चमचा लाल तिखट,मीठ, अर्धी वाटी दही. कृती : कारल्याचे तुकडे तळून घेऊन बाजूला ठेवा. आता कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, आले आणि हिरवी…
माजोर्डा समुद्रकिनारा
माजोर्डा समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे मऊ सोनेरी वाळू आहे. आनंदाने डोलणारी नारळाची झाडे आणि वारे या किनाऱ्याच्या प्रेमात पाडतात. येथे वॉटर स्कीइंग, डॉल्फिन स्पॉटिंग, बनाना राईड, पॅरासेलिंगचा आनंद घेऊ शकता. माजोर्डा किनाऱ्यावर वाजवी किमतीत सेवा देणारी काही शॅक आहेत. काही लक्झरी हॉटेल्स…
नंदगिरी किल्ला
नांदेड जिल्ह्यात आज फक्त अवशेष शिल्लक असणारा नंदगिरी किल्ला होता. गोदावरी नदीच्या काठी हा किल्ला होता. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. नंदगिरी किल्ला नांदेड शहरातील अरब गल्लीत आहे. हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने देशाशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या शहरातून येथे एसटी तसेच…
जायकवाडी धरण
गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून जातात. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आले आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते. पूर्ण क्षमतेने भरलेले धरण दोन वर्षांची शेतीच्या पाण्याची…
पाथरीचे साई मंदिर
शिरडीचे साई संस्थान देश-विदेशात लोकप्रिय आहे. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविकांची उपस्थिती शिरडीत असते. साईबाबांच्या दानपेटीत भाविक मौल्यवान वस्तू दान करतात. यामागे साईबाबांची प्रचिती मिळत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. बाबांचा जन्म यावरुन भक्तमंडळींमध्ये अनेक सुरस कल्पना आहेत. मात्र, सन १९७० च्या दशकामध्ये एक संशोधन झाले….
वटपौर्णिमा
हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेचा दिवस हा ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि आपल्या यजमानांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. ‘वडाचे झाड’ हे निसर्गतःच दीर्घायुषी असल्यामुळे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाचे पूजन करायची परंपरा भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली असावी….
केंद्रीय लोकसेवा आयोग
‘केंद्रीय लोकसेवा आयोग’ यालाच ‘संघ लोकसेवा आयोग’ असेही म्हणतात. या संस्थेची तरतूद भारतीय राज्यघटनेतील भाग १४, कलम ३१५-३२३ मध्ये दिलेली आहे. हा एक संवैधानिक आयोग आहे म्हणजेच, हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे. ही देशातील एक निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय…
विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे आकर्षण
अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच या पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी ठाणे शहरात नुकत्याच झालेल्या एका चर्चासत्रात शहरातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिकवणी वर्गांचे संचालक आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भयानक सत्य मांडले. विद्यार्थ्यांच्या दफ्तरांमध्ये गुटखा पाकिटे, पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी, ई-सिगारेट आढळत असल्याचे त्यांनी उपस्थित…
…तर तुम्ही महान नेते आहात – इंद्रा नूयी
रिसेप्सनिस्ट ते पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी यांचा थक्क करणारा प्रवास : पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती व कंपनीच्या संचालक मंडळातही त्यांचा समावेश करण्यात आल्याने गदगद झालेल्या इंद्रानूयी ही बातमी आपली आई, पती आणि दोन मुलींना सांगण्यास उत्सुक होत्या. त्यासाठी त्या लगेच घरी आल्या आणि…
मुलांवर दडपण नको
बदलत्या काळाने केवळ लोकांचे कपडे घालण्याची पद्धतच बदलली नाही, तर त्यांची विचारसरणी, राहणीमान आणि खाण्याच्या सवयींमध्येही बदल दिसून आला. या बदलामध्ये इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यातील एक म्हणजे शिक्षण व्यवस्था होय. वाचन आणि लेखनाचा चांगल्या भविष्याशी थेट संबंध आहे. त्यामुळे ते करण्यासाठी मुलांवर सुरुवातीपासूनच…
केस गळण्याची कारणे
केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे, ज्यामुळे बरेच लोक त्रस्त असतात. केस गळणे ही अगदी सामान्य समस्या आहे. जर ही समस्या वाढू लागली आणि नवीन केस उगवले नाहीत किंवा उशीरा आले तर याला ‘केस गळणे’ म्हणतात. डोक्यावर केस विरळ दिसतात, भविष्यात यामुळे टक्कल पडण्याचा धोका…
मानसिक आरोग्याची काळजी
आजच्या काळात बिघडलेले मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या आहे. खराब मानसिक आरोग्याची सुरुवात मानसिक तणावापासून होते. जर ताण वेळेवर ओळखला गेला नाही आणि त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ते मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडवते. एकदा का मानसिक स्वास्थ्य बिघडले की तुमचा विचार, मनःस्थिती आणि वागणूक…
पनीर कलाकंद
पनीर कलाकंद ही सर्वात प्रसिद्ध भारतीय गोड पाककृतींपैकी एक आहे. कोणत्याही प्रसंगात ही स्वादिष्ट गोड आवश्यक आहे. घरी कलाकंद सहज तयार करू शकता. पनीर (कॉटेज चीज), वेलची पावडर, ताजी मलई, दुधाची पावडर, बदाम आणि पिस्ते वापरून कलाकंद विशेषत: सणांमध्ये बनवले जाते. जर तुम्हाला ड्राय फ्रूट्स…
भारतातील सुरक्षा दलांची मोठी कारवाई
अलीकडील काळात भारतातील सुरक्षा दलांनी दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाया केल्या आहेत. या कारवायांमुळे देशाच्या विविध भागांतील सुरक्षेच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला असून, चकमक अद्याप सुरू आहे. या भागात दहशतवाद्यांच्या…