मुख्यमंत्र्यांच्या मदतीमुळे भाविक सुरक्षित रवाना
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीने पुढाकार घेत केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी थेट समन्वय साधला. या राजनैतिक हस्तक्षेपानंतर सर्व भाविक २८ ऑगस्ट रोजी सकाळी…