पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ
पुणेकरांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महामेट्रो प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरात वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता पीक अवर्समध्ये म्हणजेच गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो गाडी सोडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. वनाज ते रामवाडी मार्गिकेवर यासंदर्भातील सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. २,५०,०००…