त्रिशूल युद्ध संग्रहालय खुले
लेह येथील कारू भागात ‘त्रिशूल युद्ध संग्रहालय’ नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. १५ जून २०२० च्या गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या भारतीय वीरांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले आहे. गलवान संघर्षात शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या वीरपत्नी बिकुमाला संतोषी यांच्या हस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण पार पडले….