मुंबईत सदतीस अंश तापमान
कुलाबा येथील हवामान केंद्रामध्ये ऑक्टोबर महिन्यातील गेल्या १४ वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. रविवारी कुलाबा वेधशाळेत ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. संपूर्ण मुंबई शहरात उकाड्याची तीव्र लाट पसरली असून नागरिक तीव्र उन्हाच्या झळांनी त्रस्त झाले आहेत. ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान १४ वर्षांतील…