आयक्यूचे स्मार्टफोन्स

आयक्यू कंपनी भारतीय ग्राहकांसाठी नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनी २१ ऑगस्टला ‘आयक्यू झेड ९ एस 5जी’ आणि ‘आयक्यू झेड ९ एस प्रो ५ जी’ लाँच करणार आहे. कंपनीने याबद्दल माहिती दिली आहे की, कंपनी तीन शक्तिशाली चिपसेटसह आयक्यू झेड ९ एस ५ जी आणत आहे. हा फोन 4एनएम टीएसएमसीसह आणला जात आहे.

हा फोन 120हर्टझ स्क्रीन रिफ्रेश दर आणि 4500 नीटस लोकल पीक ब्राइटनेससह आणला जाईल. हा फोन 3डी वक्र डिस्प्लेसह येत आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध असेल. ॲमेझॉनवर तयार केलेल्या फोनच्या लँडिंग पेजवर फोनचे दोन्ही रंग दाखविण्यात आले आहेत. कंपनीने नवीन सीरिजच्या कॅमेरा, बॅटरीबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. नवीन फोनच्या इतर स्पेक्सची माहिती लवकरच येईल.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,865 वेळा पाहिलं