यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
‘यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य’ हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक आहे. सांगली जिल्ह्यातील ‘वाळवा’ तालुक्यात ‘कृष्णा’ नदीच्या खोऱ्यात असलेले हे अभयारण्य सागरोबा डोंगरावर वसले आहे. सन १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. धो.म. मोहिते या वनस्पती आणि वन्यजीवप्रेमीच्या ध्यासातून हे अभयारण्य साकारले आहे….