भारत – चीन सीमावादावर चर्चा
भारत आणि चीन सीमाप्रश्नावर उच्चस्तरीय चर्चा सुरू झाली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर चीनची राजधानी बीजिंग येथे पोहोचले आहेत. तेथे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत भारत-चीन सीमाप्रश्नावर विशेष प्रतिनिधी स्तरावरील २५ व्या फेरीची परिषद आयोजित केली गेली आहे….