ॲड्रेनलिन संप्रेरक – निसर्गदत्त अमोघ शस्त्र
आपल्या शरीराच्या आत एक अत्यंत जागृत, धाडसी आणि चपळ रक्षक दडलेला असतो, ज्याचे नाव आहे—’ॲड्रेनालिन’. रोजचे आयुष्य जेव्हा संथ आणि साध्या गतीने चाललेले असते, तेव्हा हा रक्षक अगदी शांत बसून असतो. मात्र, अचानक समोर एखादा मोठा धोका आला, पाठीमागे एखादा हिंस्त्र प्राणी लागला, किंवा एखाद्या…