मेघालयमध्ये सौम्य भूकंपाचा धक्का
भारताच्या ईशान्येकडील मेघालय राज्यामध्ये रविवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक आठ इतकी नोंदवण्यात आली. मेघालय राज्यातील वेस्ट खासी हिल्स या जिल्ह्यामध्ये हा भूकंप झाला. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता अत्यंत कमी असल्यामुळे राज्यात कोठेही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही….