भारतीय अंतराळ मोहिमेचा नवा आराखडा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने देशाच्या अंतराळ प्रवासातील महत्त्वाकांक्षी ध्येय जाहीर केले आहे. हैदराबाद येथे आयोजित प्रो. सतीश धवन मेमोरियलमधील व्याख्यानामध्ये बोलताना इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सन २०४० पर्यंत एक भारतीय अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवेल आणि तिथे दिमाखात भारताचा तिरंगा फडकवेल. हे केवळ…