मुंबई – पुणे नवीन समांतर द्रुतगती मार्ग
मुंबई आणि पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असा एक नवीन आणि अद्ययावत द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन मार्गाचा सविस्तर प्रकल्प विकास आराखडा तसेच व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकृत निविदा मागविल्या आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवासाचा…