मुळा धरण नव्वद टक्के भरले
अकोले तालुक्यातील घाटघर परिसरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मान्सूनच्या जोरदार आगमनानंतर घाटघर भागात चालू हंगामातील पावसाने तब्बल ४ हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील भंडारदरा निळवंडे ही धरणे तुडुंब भरली आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण ९० टक्के भरले आहे….