श्री नृसिंहवाडी
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या नृसिंहसरस्वतींचे स्थान म्हणजे नृसिंहवाडी होय. कोल्हापूर जिल्ह्यात मिरजेपासून जवळ, कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर हे ठिकाण आहे. श्री नृसिंहसरस्वती यांचे येथे १२ वर्षे वास्तव्य होते. नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणारे हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये ‘दत्तप्रभूंची राजधानी’ म्हणून प्रसिद्ध आहे….