साताऱ्यातील ठोसेघर धबधबा
पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्यावर डोंगरांच्या उंच कपारीतून जमिनीच्या दिशेने झेपावणारे सफेदशुभ्र धबधबे दिसतात. अर्थातच, धबधब्यांचे आकर्षण प्रत्येकाला असते. धबधब्यांखाली मनमुराद आंघोळ करण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत, जे माणसांची गर्दी खेचून आणतात. पावसाळी पर्यटन हंगामात या धबधब्यांवर गर्दी होते. कास…
मैत्री ठेवावी जपून
आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी असतात. त्यातील एक किंवा दोनच खास असतात. आपली खास मैत्री जपून ठेवणे आयुष्यात फार गरजेचे असते. मैत्रीला मोठे महत्त्व आहे. ती जपून ठेवली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मैत्री हवीच ! मैत्री जपून ठेवण्यासाठी मित्र किंवा मैत्रिणीस कधीतरी घरी बोलवा. किंवा…
चमकदार चेहऱ्यासाठी झेंडूची फुले
चमकदार त्वचेसाठी तुम्ही चेहऱ्यावर झेंडूच्या फुलांचा वापर करु शकता. झेंडूच्या फुलांपासून बनवलेले लेप, मुरुम आणि डाग दूर करण्यासाठी मदत करतात. झेंडूच्या फुलामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंटसारखे गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. झेंडूचा ‘फेस पॅक’ कसा बनवायचा ते येथे जाणून घ्या. झेंडूच्या फुलापासून बनवलेला लेप चेहऱ्यावरील डाग…
अतिखाण्यावर नियंत्रण हवे
अनेकांना पूर्ण जेवण घेतल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. काहीजणांना पोट भरलेले असूनही ‘फास्ट फूड’ किंवा ‘जंक फूड’ खावेसे वाटते, आणि मग ते खातात. भूक लागणे ही चांगली गोष्ट आहे. पण पोट भरलेले असतानाही अति खावेसे वाटणे ही चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ आपल्यात काही शारीरिक…
केरळची प्रसिद्ध भाजी – एरिशेरी
साहित्य : पिकलेल्या भोपळ्याचे तुकडे – 1 वाटी, कच्च्या केळ्याचे तुकडे – 1 वाटी, सुरणाचे तुकडे – 1 वाटी, लाल चवळी – 1 वाटी, हळद – 1 लहान चमचा, जिरे – 1 लहान चमचा, लसूण – 2 पाकळ्या, हिरव्या मिरच्या – 3, मिरी – 1…
रबर शिक्का निर्मिती उद्योग
कोणत्याही कार्यालयीन कामकाजात शिक्क्याला महत्त्व असते. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल की, “या पत्रावर स्टॅम्पची गरज आहे” आणि त्या पत्रावर काम मिळाला की ते कामही चटकन होऊन जाते. तर अशा या ‘रबर शिक्का’ उद्योगाबद्दल जाणून घेऊ. बाजारात दोन प्रकारच्या रबर शिक्क्यांना मागणी आहे. पहिला प्रकार…
आयुर्वेदिक औषधांचे दुकान
जगाला पुन्हा एकदा आयुर्वेदाचं महत्त्व समजू लागलं आहे. झटपट औषधांपेक्षा मूळातून आजार बऱ्या करणाऱ्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीकडे लोकांची जास्त ओढ आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आयुर्वेदिक दवाखाना, रुग्णालय यांच्या आसपासच्या परिसरात किंवा एखाद्या वैद्याच्या दवाखान्यामध्येही थोडी जागा घेऊन आपण औषधालय सुरू…
केवडा लागवड
भारतात फुलशेतीला महत्त्व प्राप्त होत आहे. बरेच शेतकरी फुलांची शेती करताना आपण महाराष्ट्रातही पाहायला लागलो आहोत. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलशेतीमध्ये यश मिळताना दिसत आहे. केवड्याचा वापर सुगंधी द्रव्ये, मिठाई, सौंदर्य उत्पादने यांमध्ये केला जातो. ‘केवडा’ हा जगातील सर्वांत सुगंधी फुलांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेलं…
कोल्हापुरचा कणेरी मठ
देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीचे वास्तव्य असलेले करवीरनगरी अर्थात कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक देखणे पर्यटनस्थळ आहे. हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर असून भोवताली सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिंक आहे. या कोल्हापूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर ‘कणेरी’ हे…
चिंचणी सागरकिनारा
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये गजबजलेल्या जीवनापासून शांतता प्रदान करणारा नयनरम्य असा चिंचणी सागरकिनारा आहे. तारापूर तालुक्यातील हा समुद्रकिनारा सोनेरी वाळू आणि स्वच्छ निळ्याशार पाण्यासाठी ओळखला जातो. हा समुद्रकिनारा हिरवाईने वेढलेला आहे. येथे आभाळास भिडू पाहणारी नारळाची झाडे आहेत. चिंचणी किनारा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.हा किनारा…
कलावंतीण दुर्ग किल्ला
महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ ‘कलावंतीण’ हा डोंगरमाथ्यावर बांधलेला टेहळणी गड आहे. समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर उंचीवर हा गड असून वर चढण्यासाठी १६००० पायऱ्या आहेत. गडाच्या पायथ्याशी चढण असून पुढे पठारासारखा मोकळा भाग असून त्याला ‘प्रबळमाची’ असे म्हणतात. या माचीवर काही आदिवासी आणि ठाकर बांधवांची वस्ती…
जांभूळ बेट
कोणतीही नदी तसेच समुद्रातील बेटे मुळातच नितांतसुंदर असतात. दूरवरुन निळ्याशार पाण्यात पाहताना ही बेटे जणू काही छानपैकी विहार करीत असलेली भासतात. देशभरातील अशी काही बेटे आहेत, जी पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जातात. असेच महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात फार सुंदर बेट आहे. हे बेट ‘जांभूळ बेट’ या नावाने…
मायलेकीचे नाते
आई आणि मुलीचे नाते जितके सुंदर असते, तितकेच ते गुंतागुंतीचे असते. मुली त्यांच्या आईच्या सर्वात जवळच्या असतात, मात्र तेवढाच स्वतःच्या आईशी सर्वात जास्त संघर्षही असतो. जेव्हा मुलगी किशोरवयीन होते तेव्हा हे नाते अधिक गुंतागुंतीचे होते. हा गुंता सोडवून हे नाते छान खेळकर करण्यासाठी आपल्या किशोरवयीन…
त्वचेसाठी टोमॅटो
टोमॅटो हा आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्याचा वापर भाजी, कडधान्ये, कोशिंबीर, सूप अशा अनेक प्रकारात केला जातो, पण त्याची उपयुक्तता एवढ्यापुरती मर्यादित नाही. टोमॅटोमुळे आपल्या त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. टोमॅटोचा वापर फेस पॅकपासून टोनर सिरमपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरू शकता. टोमॅटो त्वचेसाठी खूप…
वजन घटवण्यात आहाराची भूमिका
अलीकडेच ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन ओपन नेटवर्क’ मध्ये एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार प्राण्यांपासून तयार केलेली प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश असणारा कार्बयुक्त आहारसुद्धा जलद वजन वाढण्याचा धोका संभोवतो. दुसरीकडे, कमी कार्बयुक्त आहार, ज्यात वनस्पती-आधारित प्रथिने असतात, तो जलद वजन वाढू देत नाही….
तूप-मसाले भात
साहित्य : बिर्याणीचा तांदूळ – 2 कप, साजूक तूप – 5 ते 6 चमचे (विकतचेही तूप चालेल), लवंगा – 4 ते 5, लिंबाचा रस, मिरी – 4 ते 5, चिरलेले कांदे – 2, तमालपत्र – 2, वेलची – 4, दालचिनी – 2 काड्या, काजू –…
हातमोजे उद्योग
कोविडच्या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक शब्द जनसामान्यांच्या रोजच्या वापरात रूढ झाले. आपण वैद्यकीय क्षेत्रात रोज वापरात येणाऱ्या मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, पीपीई कीट, केस झाकायला टोपी यांसारख्या गोष्टी रोज वापरू लागलो. या गोष्टींपैकी शस्त्रक्रियेच्या वेळी वापरले जाणारे हातमोजे म्हणजेच ‘ग्लोव्हज्’ उद्योगाबद्दल जाणून घेऊया. या उद्योगातून मिळणारा…
आंबा विक्री व्यवसाय
वर्षभरातून एकदाच खायला मिळणाऱ्या आंब्याला देशविदेशातून मागणी आहे. मार्चपासून आंब्याची चाहूल बाजारात लागू लागते. तो जूनपर्यंत मुक्कामी असतो. त्यामुळे कमी महिन्यात जास्त नफा करून देणारा असा हा ‘आंबा विक्री व्यवसाय’. आंब्याचा रस हल्ली प्रक्रिया उद्योगामुळे आपण वर्षभर चाखू शकतो. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे आंब्याचे विविध पदार्थ…
फणस शेती
फणस हे नगदी पीक आहे. त्यामुळे याची शेती ही नेहमी फायद्याची शेती मानली जाते. कोकण आणि दक्षिण भारतात या जोरावर अनेक प्रक्रिया उद्योग उभे आहेत. पक्क्या फणसाएवढाच कच्च्या फणसापासून तयार केलेले पदार्थही चविष्ट आणि रुचकर असतात. त्यामुळे कच्च्या आणि पक्क्या दोन्ही स्वरुपातील फणसांना बाजारात विशेष…
संत जनाबाईंची समाधी
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात श्री विठ्ठलाची परमभक्त संत जनाबाईंचे समाधीस्थान आहे. अनेक भाविकांची पावले यादिशेने वळतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरीच्या काठावर हे सुंदर समाधी मंदिर आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड हा एक तालुका आहे. गोदावरीच्या तीरावर शांतपणे विसावलेला हा तालुका म्हणजे संत जनाबाईचे जन्मस्थान आहे….
दांडी समुद्रकिनारा
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पालघर या शहरापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर दांडी सागरकिनारा आहे. पालघर येथून दांडी किनाऱ्यावर जाण्यासाठी स्थानिक कॅब किंवा ऑटो-रिक्षा भाड्याने घेऊ शकता, दांडी किनारा फार सुंदर आहे. येथील सोनेरी वाळू आणि अप्रतिम हिरवाई लक्षवेधी आहे. दांडी किनारपट्टीवर लांबपर्यंत चालण्याचा अनुभव घेता येतो….
दौलताबाद किल्ला
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद किल्ला हे एक आश्चर्यच मानले जाते. ह्याला औरंगाबादमध्ये ‘औरंगाबाद किल्ला’ असेही म्हटले जाते. या किल्ल्याचे पहिले नाव दौलताबाद नसून ‘देवगिरी’ असे होते. महंमद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी किल्ल्यावर स्थलांतरित केली. त्यावेळी त्याने देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’…
सहस्त्रकुंड धबधबा
महाराष्ट्राचा भुगोल अभ्यासताना सहस्रकुंड धबधबा वाचनात येतोच. नांदेड जिल्ह्यातील धबधब्यांपैकी पर्यटकांची गर्दी खेचून आणणारा हा एक धबधबा आहे. पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे. या धबधब्यांना भेट द्यायची झाल्यास पर्यटक माहूर येथील रेणुकादेवी मंदिर, दत्त शिखर, अनुसया मातेचे मंदिर पाहू शकतात. पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात…
मुलांना स्वयंपाक कला शिकवा
स्वयंपाक ही एक कला आहे. याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. या कलेचे ज्ञान नसेल तर अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागून नुकसानच जास्त होईल. पालकांनी लहानपणापासूनच मुलांना छोट्या-छोट्या गोष्टी करायला शिकवल्या पाहिजेत. मुलांचे लाड करण्याच्या ओघात त्यांना काम कसे सांगावे, अशा विचाराने त्यांचा अगदीच…
सौंदर्यवृद्धीस पोषक पदार्थ
जगातील प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधने उत्पादने तुम्हाला काही क्षणांसाठी सुंदर आणि तरुण बनवतात, यात शंका नाही, परंतु त्यांचा दीर्घकाळ वापर त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतो. खरे तर, सौंदर्य उत्पादने त्वचेवर कार्य करतात; परंतु…