रायरेश्वर किल्ला
महाराष्ट्रात उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये रायरेश्वर हे प्रसिद्ध पठार आहे. ११ किमी. लांब आणि १.५ किमी. रुंद पसरलेले हे पठार आहे. हा किल्ला पुण्याहून ८५ किमी. अंतरावर, तर भोरवरून ३० किमी. अंतरावर आहे. खाजगी वाहनाने किंवा एस. टी. ने आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू…
कोयना वन्यजीव अभयारण्य
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात मध्यभागी कोयना वन्यजीव अभयारण्य आहे. घनदाट अशा हिरव्यागार जंगलात ते वसलेले आहे. भारत सरकारने सन 1985 मध्ये या संरक्षित वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.पश्चिम घाटामध्ये मुबलक पाण्याचा प्रवाह आणि समृद्ध वनस्पतींमध्ये असणारे हे अभयारण्य मन सुखावणारे आहे. संपूर्ण अभयारण्य 423 चौ.मी….
गिझर निर्मिती उद्योग
प्राचीन काळी पाणी गरम करण्यासाठी नैसर्गिक इंधने वापरली जात होती. विशेषतः लाकडाचा वापर सर्वाधिक होत असे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने देशातील बहुतांश लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. लाकडासह शेणखत, भाताची ताडे, चिपाड अशी कृषी उत्पादने वापरली जात होती. नंतर घासलेटचे स्टोव्ह आले. आज रेशन दुकानातून घासलेटही…
लाईट फिटिंग साहित्य निर्मिती
आपल्या देशात वीज मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मागणीनुसार पुरवठा होत नसला तरी विजेचा वापर करून अनेक वस्तू बनविल्या जात असल्याने वीज फिटिंगच्या साहित्याला मोठी मागणी आहे. आज अगदी गावागावात वीज पोहोचली आहे. विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने पारंपरिक वीजनिर्मितीबरोबर अपारंपारिक स्रोतांपासून वीजनिर्मितीचे मोठे प्रकल्प आपल्या…
सीताफळ लागवड
सीताफळ हे गोड फळ सर्वांच्या आवडीचे आहे. महाराष्ट्रात बीड, औरंगाबाद, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात ते घेतले जाते. बार्शीमध्ये ‘एनएमके-०१’ (गोल्डन) या उत्तम दर्जाच्या संकरित जातीची लागवड केली जाते. ‘लाल सीताफळ’, ‘बालानगरी’, ‘वॉशिंग्टन’ आणि ‘पुरंदर’ यांसारख्या इतर जातीसुद्धा प्रसिद्ध आहेत. बीडचे हे सर्वात प्रसिद्ध फळ आहे….
कंकालेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले आहे. ‘बिंदुसरा’ नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने दहाव्या ते 11 व्या शतकात हे मंदिर बांधले. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. या…
तारकर्ली समुद्रकिनारा
तारकर्ली समुद्रकिनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सर्वोत्तम कोकण किनारा आहे. येथील समुद्राचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. समुद्रकिनारासुद्धा मस्त मोकळा आणि स्वच्छ आहे. येथे ‘स्नॉर्कलिंग’ आणि ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद लुटण्यासाठी आवर्जून पर्यटक येतात. पांढरी वाळू आणि स्वच्छ निळे पाणी, डॉल्फिन, कर्ली नदीचे रमणीय दृश्य डोळ्यांनी टिपता…
पेडका किल्ला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘कन्नड’ तालुक्यात ‘पेडका’ हा एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी ‘पेडकावाडी’ धरण आहे. या धरणाच्या मातीच्या बांधावरून चालत गेल्यावर ‘पेडका’ किल्ल्याचा पायथा गाठता येतो. साधारणपणे ३० मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथून आपल्याला उत्तर आणि दक्षिण बाजूला डोंगरांचे 2 सुळके दिसतात. यांच्यामधील घळीतून…
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ
‘तोरणमाळ’ हे भारतातील नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे. अतिदुर्गम भागात असल्याने आणि जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते. उंची आणि भौगोलिक वातावरणाने येथील…
रोज रहा ताजेतवाने
आजच्या जगात दररोज ताजेतवाने दिसणे फार गरजेचे आहे. कार्यालय असो की घर, आप ले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. या धकाधकीच्या जीवनात अगदी रोज ताजेतवाने दिसण्यासाठी चेहर्यावर ‘मेक-अप’ असायला हवा, असा आपला समज असेल तर तो बाजूला ठेवायला हवा. जीवनशैलीतील अगदी साध्या…
नाभीत तेल घालण्याचे फायदे
भारतामध्ये प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना मालिश करण्यात येते. हात, पाय आणि नाभी अर्थात बेंबीच्या ठिकाणी तेलाने मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात. पारंपरिकतेनुसार नाभीमध्ये तेल घालणे हे अधिक योग्य असून आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे नाभीमध्ये तेल घालून मालिश केल्याने पोटातील दुखणे कमी…
आम्रखंड
साहित्य : ताजे दही – दोन ते अडीच कप (500 ग्राम), पावडर साखर – पाव कप, मँगो पल्प – 1 कप, काजू-बदाम – 4, पिस्ता – 5 ते 6, वेलची – 2 कृती : प्रथम दही जाड कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचे सर्व पाणी निथळल्यावर…
खडू निर्मिती उद्योग
शिक्षणाची सुरुवात खर्याे अर्थाने हातात खडू घेण्यापासून होते. शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण वर्गामध्ये शिकवताना फळ्यावर लिहिण्यासाठी खडू लागतो. खडू निर्मिती उद्योगाला अलीकडे डिजीटल साधनांमुळे थोडासा उतार सहन करावा लागत आहे. पण अनेक शाळांमध्ये आजही पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण खडूने पूर्ण होते. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी, महाविद्यालयीन…
छापखाना व्यवसाय
कागदी छापखाना हा वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी कच्चा माल, यंत्रसामग्री, जागा आणि इमारतीची संपूर्ण किंमत व्यवसायाच्या विस्ताराच्या प्रमाणात ठरवली जाते. ‘लहान’ आणि ‘मोठा’ अशा दोन स्वरूपात हा व्यवसाय सुरू करू शकता. आपणास आवश्यक असेल अशी यंत्रसामग्री बाजारात उपलब्ध आहे. लहान यंत्रावर तासाला 400…
पपई लागवड
पपई हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे. उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्यामुळे या फळास व्यावसायिक महत्त्व आहे. पपईची लागवड ‘दक्षिण मेक्सिको’ आणि ‘कोस्टारिका’ येथे झाली. इतर फळपिकांपेक्षा ते लवकर उत्पादन नेते. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत फळे देते. फळांचे उत्पादनही जास्त असते. ईशान्येकडील सर्व राज्यांच्या पायथ्याशी आणि…
केसांकडे दुर्लक्ष नकोच
जाड आणि मजबूत केस प्रत्येकाला हवे असतात. केस निरोगी ठेवण्यासाठी आपण काय-काय करत असतो. एकापेक्षा एक महाग उत्पादने वापरतो. काही वेळेस घरगुती उपायदेखील केले जातात; परंतु तरीही केसांशी संबंधित समस्या कमी होत नाहीत. काही वेळेस तर त्या बंद झाल्या तरी पुन्हा त्रास सुरू होतो.काही वेळेस…
आरोग्यवर्धक नारळपाणी
नारळपाणी हे एक नैसर्गिक पेय आहे. शरीरासाठी ते अत्यंत गरजेचे आहे. शरीराला ऊर्जा पुरविण्याची क्षमता या पाण्यात असते, म्हणूनच रूग्ण, गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळपाणी हे मानवजातीसाठी एक वरदान आहे, म्हणून ते आवर्जून प्यावे. नारळाच्या पाण्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता असते. कोलेस्ट्रॉल…
भडंग चिवडा
शाळांना उन्हाळी सुट्टी आहे म्हटल्यावर मुलांना रोज काहीतरी वेगवेगळा सुका खाऊ येता – जाता तोंडात टाकायला हवा असतो. मग अशावेळी नेहमी काय बनवून ठेवणार हा प्रश्न पालकांना भेडसावत असतो. अशावेळी आपण झटपट १५ ते २० मिनिटांत भडंग चिवडा घरच्याघरी बनवू शकतो. साहित्य4 मोठ्या वाट्या भडंग…
शाई निर्मिती
कमी भांडवलात निश्चितपणे फायदेशीर उद्योग शोधत असाल तर शाई उत्पादन उद्योग हा एक चांगला पर्याय आहे. या मालाला वर्षभर मागणी असते. दैनंदिन जीवनातील सर्व लिखित कामांसाठी शाईची आवश्यकता असते. शाळेतील मुलांना लिहिण्यापासून ते सरकारी आणि खासगी कार्यालयात शिक्के मारण्याच्या कामापर्यंत शाई लागते. शाईचे पेन असो…
पॉलिथिनपासून पोती निर्मिती
प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर चांगला वापर करणारा उद्योग म्हणजे उच्च घनतेच्या पॉलिथिनपासून बनवलेल्या पोत्याचा उद्योग होय. या उद्योगाला बाजारपेठेत सर्वत्र मागणी असूनही प्रामुख्याने सिमेंट उद्योगात अशा पोत्यांचा वापर बहुतांशी सिमेंट भरण्यासाठी केला जातो. तंबू तयार करण्यासाठी, बागांच्या छतांसाठी विणलेल्या प्लास्टिकच्या जाड कागदाचा वापर केला जातो. सिमेंट…
कॉफी शेती
भारतातील कॉफी उत्पादनाचे दक्षिण भारतीय राज्यांच्या डोंगराळ प्रदेशात वर्चस्व आहे. यामध्ये कर्नाटकचा वाटा ७१% आहे. येथील एकट्या ‘कोडागु’ मध्ये भारतातील ३३% कॉफीचे उत्पादन होते. त्यानंतर २१% सह केरळ आणि तमिळनाडू ही दोन राज्ये आहेत. भारतीय कॉफी ही थेट सूर्यप्रकाशाऐवजी सावलीत उगवलेली जगातील सर्वोत्तम कॉफी असल्याचे…
कोल्हापूरचे रेणुका मंदिर
महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये प्रसिध्द रेणुका मंदिर असून हे मंदिर कोल्हापूर बस स्थानकापासून १० मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे रेणुकादेवी, मातंग देवी आणि परशुराम अशी देवस्थाने आहेत. रेणुका देवीला ‘ओढ्यावरची यल्लमा’ असेदेखील म्हणतात. कर्नाटकातील बेळगाव येथील सौंदत्ती हे तिचे मुख्य स्थान आहे. ही देवता कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश…
आचरा समुद्रकिनारा
समुद्रातील डॉल्फिन पाहणे, सूर्यस्नान करणे आणि पोहणे आवडत असेल, तर सिंधुदुर्गातील आचरा समुद्रकिनाऱ्यावर जावे. हा किनारा मालवण तालुक्यात असून मालवणपासून अंदाजे 22 किलोमीटर अंतरावर आहे. जलप्रेमींना आकर्षित करणारे डॉल्फिन येथे मोठ्या संख्येने येतात. जलचर प्रजातींव्यतिरिक्त येथे विविध प्रजातींचे पक्षीसुद्धा आढळतात. जलक्रीडा करणारे पर्यटक आचरा किनाऱ्यावर…
कोल्हापूरमधील गगनगड
महाराष्ट्राचे ‘चेरापूंजी’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘गगनबावडा’ गावात ‘गगनगड’ उभा आहे. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नाथपंथीय गैबीनाथांचे हे मूळ स्थान आहे. १९ व्या शतकात गगनगिरी…
कार्ला लेणी
लोणावळ्याच्या जवळील कार्ला या गावाजवळ ‘कार्ला लेण्या’ आहेत. या लेण्या लोणावळ्यापासून 11 किमी अंतरावर आहेत. ‘भाजा लेणी’, ‘पाटण बौद्ध लेणी’, ‘बेडसे लेणी’ आणि ‘नाशिक लेणी’ या लेण्यादेखील या भागात पाहण्यास मिळतात. या ठिकाणी ‘एकवीरा देवी’चे देवस्थान आहे. या लेण्या इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इ.स. 5…