स्मार्टफोन दुरुस्ती व्यवसाय
‘स्मार्टफोन’ ही आजकाल प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. माणसे आपली सर्व कामे आता स्मार्टफोनवर करतात. भविष्यातही स्मार्टफोनची मागणी वाढणारच आहे. त्यामुळे स्मार्टफोन विक्री आणि दुरुस्ती व्यवसायाला आज फार महत्त्व आलेले आहे. आगामी काळातही या व्यवसायाच्या वाढीत कोणतीही घट होणार नाही. भारतात 450 दशलक्षपेक्षा जास्त स्मार्टफोन…
ज्वारी लागवड
भारतातील ज्वारीच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी 50% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. देशातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी 52% उत्पादन महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये होते. ज्वारी हे खरीप आणि रब्बी पीक आहे. हे कोरडवाहू शेतीप्रकारातील सर्वात महत्वाचे अन्न आणि चारा पीक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर…
कोल्हापूरचा चिन्मय गणाधीश
पुणे-बंगळुरू महामार्गावर महाराष्ट्रात कोल्हापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर ‘चिन्मय गणाधीश’ ही श्री गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. सन 2001 मध्ये ही मूर्ती दर्शनासाठी खुली झाली. ‘चिन्मय संदीपन्य’ आश्रमात ही मूर्ती आहे. ही गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. संपूर्ण रचनेत 24 फूट उंच…
सासवणे सागरकिनारा
महाराष्ट्राच्या अलिबाग तालुक्यातील सासवणे या छोट्याशा गावात ‘सासवणे समुद्रकिनारा’ आहे. हा किनारा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. येथे पर्यटकांची फारशी वर्दळ नसते; मात्र तो निर्जनही नाही. आरामशीर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हा मस्त शांत किनारा आहे. अलिबाग शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर हा किनारा आहे. ‘करमरकर शिल्प संग्रहालय’…
बितनगड किल्ला
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात बितनगड किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्यास ‘बितंगा’, ‘बिताका’ या नावांनीही ओळखतात. या गडावर जायचे असेल तर प्रथम ‘घोटी’ गावात जायला हवे. इथून भंडारदरा रस्त्यावर ‘टाकेद’ गावाला जाण्यासाठी एक फाटा आहे. या फाट्यावरून पुढे गेल्यावर ‘बितनवाडी’ हे गाव मिळते. बितनवाडी गाव बितनगडाच्या पायथ्याशी…
भंडारदरा धरण
भंडारदरा हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. येथील ‘प्रवरा’ नदीवर सन 1910 मध्ये बांधलेले ‘विल्सन धरण’ हे सर्वात मोठे मातीचे धरण आहे. या धरणाला ‘भंडारदरा धरण’ म्हणूनही ओळखले जाते. हे धरण त्या काळातील अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेबद्दल माहिती देते. या धरणाच्या पायथ्याशी असलेली घनदाट हिरवळ…
काकडीची चटणी
उन्हाळ्याचे दिवस आहेत. आहारातही सौम्य पदार्थ असावेत हे वाटणे स्वाभाविक आहे. आज बनवूया दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारी काकडीची चटणी ! साहित्य : काकडी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, २ हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, २ लसूण पाकळ्या, २ ते ३ चमचे चिंचेचा कोळ, अर्धा चमचा…
सासू सून नातेसंबंध
अलीकडे पती-पत्नी दोघेही करिअरला प्राधान्य देऊ लागल्याने संपूर्ण दिवस बाहेर कामात जात असतो. घरी आल्यावर स्वतःबरोबर कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे व्यक्तीकडे नाती जपण्यासाठी वेळ राहिलेला नाही. परिणामी, लोकांच्या मनातील नात्यांचे महत्त्व कमी झाल्याचे तज्ज्ञ म्हणतात. सध्याच्या महागाईत घर चालवण्यासाठी आणि जीवनशैली जपण्यासाठी पती-पत्नी…
केसांचे पोषण
प्रत्येक मुलीला तिचे केस निरोगी आणि पोषक असावेत असे वाटते. शेवटी सुंदर केस आत्मविश्वासासोबतच तुमचे सौंदर्य वाढवतात. प्रदूषण, धूळ, माती आणि घाण यांच्या संपर्कात आल्याने केसांचे सौंदर्य नष्ट होते. याशिवाय केसांमध्ये पोषण नसल्यामुळेही केसांचे सौंदर्य हिरावले जाते. त्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. तुम्ही…
उन्हाळ्यात खावेत असे पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले तर आपण आजारी पडू शकतो. या हंगामात, अशी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त थंडावा मिळतो. उष्माघाताचा प्रभाव कमी होतो. उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. नारळ पाणी : उन्हाळ्यात पोषकतत्वांनी युक्त नारळ…
म्हाळसाकोरे मंदिरे
नाशिकमधील ‘म्हाळसाकोरे’ गाव मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील हेमाडपंती मंदिरे दुर्मिळ आहेत. ‘म्हाळसाकोरे’ला जायचे झाल्यास नाशिकहून सायखेडामार्गे जाता येते. हे अंतर साधारण ३०-३५ किलोमीटर आहे. नांदूरमध्यमेश्वर येथून हे अंतर अवघे ४-५ किलोमीटर आहे. गावात गेल्यावर डाव्या बाजूला ‘म्हाळसा’ देवीचे मंदिर लागते. ‘म्हाळसाकोरे’ निफाड तालुक्यात आहे….
वेळणेश्वर समुद्रकिनारा
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात ‘वेळणेश्वर’ गावाजवळ ‘शास्त्री’ नदीच्या उत्तरेला वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा फार सुंदर आहे. खडकाळ समुद्र आणि स्वच्छ वातावरणासाठी तो लोकप्रिय आहे. पोहणे, सूर्यस्नान आणि मनमुरादपणे समुद्रकिनाऱ्यावरचे फिरणे यासाठीच पर्यटक या किनाऱ्याला पसंती देतात. या समुद्रकिनाऱ्यावर तयार झालेली ‘ब्राह्मण घळ’…
अर्नाळा किल्ला
‘अर्नाळा’ किल्ला हा अर्नाळा बेटावर असलेला एक सागरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार-पश्चिम भागातील ‘अर्नाळा’ या लहानशा शहराच्या किनाऱ्यावर तो वसलेला आहे. हा किल्ला इसवी सन १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. इसवी सन १८ व्या शतकात मराठा साम्राज्याने तो ताब्यात घेतला. हा किल्ला…
नेहरू तारांगण
मुंबईतील नेहरू तारांगण हे वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय शिक्षणासाठी असलेले एक प्रमुख ठिकाण आहे. नेहरू तारांगण मनोरंजनासोबतच विविध व्याख्याने, कार्यक्रम आणि प्रख्यात अवकाश संशोधकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथे मुलांना प्रत्यक्ष तारे–ग्रह कशा पद्धतीने अंतराळात विहार करतात, हे पाहता येते….
तांदूळ गिरणी उद्योग
ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कुटुंबातील तरूणांना तांदूळ गिरणी उद्योग कसा सुरू करायचा, याविषयी निश्चित माहिती असेल. या उद्योगाद्वारे ग्रामीण भागातील उद्योजकांबरोबरच शहरी भागातील व्यक्तीनाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून तो माल शहरातील व्यापाऱ्यांना विकता येतो. भारताच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत…
झाडू बनविण्याचा व्यवसाय
झाडू बनविण्याचा व्यवसाय हा सर्वत्र चालणारा एक व्यवसाय आहे. मागणी, पुरवठा, किंमत, स्पर्धक, ग्राहक सर्वेक्षण या व्यवसायासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचे संशोधन करणे गरजेचे असते. घर,व्यवसाय, कार्यालय अशा प्रत्येक ठिकाणी झाडूची गरज असते. झाडू ही अगदी प्राथमिक गरज आहे. स्वच्छतेच्या कामात…
कमळ शेती
‘कमळ’ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. अनेक औषधी आणि पौष्टिक गुणधर्मामुळे कमळाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जाते. भारतात गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची मनमोहक कमळाची फुले आढळतात. साधारणपणे कमळाच्या पाकळ्यांची संख्या 16 ते 36 पर्यंत असते. कमळात अनेक औषधी आणि पौष्टिक गुणधर्म आहेत. प्राचीन आयुर्वेदात मधुर, शीतल,…
सौंदर्यप्रसाधने निर्मिती उद्योग
सौंदर्यप्रसाधने निर्मिती व्यवसाय’ हा जागतिक बाजारपेठेत हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणारा एक व्यवसाय आहे. सध्या भारतीय सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याचे दिसते. भारताची प्रचंड लोकसंख्या पाहता या व्यवसायात नवनिर्मितीसाठी चांगली संधी असल्याचे दिसून येते. भारतीय सौंदर्यप्रसाधनांना परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने सौंदर्यप्रसाधने…
सिद्धनाथ मंदिर खरसुंडी
सिद्धनाथ हा शंकर देवांचा अवतार मानला जातो. सिद्धनाथ हा आटपाडी आणि लगतच्या प्रदेशांचा संरक्षक देव आहे व महाराष्ट्रातील अनेक प्रादेशिक क्षेत्रपाल देवांपैकी एक आहे. सिद्धनाथांचे ऐतिहासिक मंदिर, 450 वर्षांपूर्वी बांधलेले मोठे मंदिर आहे. या मंदिरातील शंकराचा पुनर्जन्म आहे ज्याला नाथबाबा असे म्हणतात. या देवाला दोन…
आंजर्ले सागरकिनारा
महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ अप्रतिम असा ‘आंजर्ले’ सागरकिनारा आहे. आपली सुट्टी कोकणात आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवायची असेल तर ‘आंजर्ले’ समुद्रकिनाऱ्याची निवड करायला काहीच हरकत नाही. या किनाऱ्यावर काळ्या आणि पांढऱ्या वाळूचे एकत्रीकरण दिसते. आंजर्लेतील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘काड्यावरचा गणपती मंदिर’ हे आहे. हे मंदिर गणेशमूर्ती…
मांजरसुभा किल्ला
अहमदनगर जिल्ह्यात ‘मांजरसुंभा’ हा किल्ला आहे. पुण्याहून हा किल्ला १४२ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. ‘वांबोरी’ घाटातील पायथ्याशी श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण सुरु झाल्यावर ‘मांजरसुभा’ गाव मिळते. ‘मांजरसुभा’ गावातून डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर किल्ल्याकडे जाणारा सिमेंटचा रस्ता लागतो. पुढे शनीमारुतीचे मंदिर आहे….
सोनावळेतील गणेश लेणी
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ‘सोनावळे’ गावाजवळ प्राचीन गणेश लेणी अथवा ‘गणेश गडद’ या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहेत. सोनावळे गावापासून साडे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे. इसवी सन १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची…
रवा इडली
साहित्य : अर्धा किलो रवा, १ लहान चमचा मीठ, अर्धा लहान चमचा मोहरी, १०-१२ कढीपत्त्याची पाने, ३०० ग्रॅम आंबट दही, १ लहान चमचा खाण्याचा सोडा आणि तेल. कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि चिरलेला कढीपत्ता व रवा घालावा. थोडासा भाजून गॅस…
कानातील आकर्षक दागिने
सणासुदीचा, लग्नसमारंभांचा हंगाम सुरू आहे. या उत्साहाच्या वातावरणात महिलांना वेशभूषा करण्यासाठी निमित्त आणि चांगली संधी मिळते. सणासुदीच्या काळात महिला सुंदर पोशाख आणि दागिन्यांची निवड करतात. पोशाख कितीही जड असला तरी मॅचिंग ज्वेलरी घातल्याशिवाय एकूणच साज अपूर्ण वाटतो. कपड्यांप्रमाणे दागिन्यांचा ट्रेंडही बदलत राहतो. दागिन्यांमध्ये कानातील दागिने…
बाळाची आंघोळ
बाळाची त्वचा नाजूक असल्याने त्याला आंघोळ घालताना आईला फार भीती वाटत असते. काळजी करू नका. आंघोळीसाठी वापरलेल्या साबणाने तसेच बाळाच्या अंगावरील तेलामुळे हात चटकन निसटू शकतो. त्याबाबत सावध रहा. बाळाला आंघोळीसाठी घेऊन जाण्यापूर्वी त्याला तेलाने छान हलक्या हाताने मसाज करा. आंघोळीसाठी आणि आंघोळीनंतर आवश्यक असलेल्या…