खानदेशच्या केळीला देशभरातून मागणी
खानदेशातील जळगाव परिसरात केळीच्या बाजारभावात अलीकडे सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आखाती देशांकडे होणारी निर्यात काही प्रमाणात घटली असली तरी देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे बाजारभाव टिकून राहिल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून कमी दरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे….