कर्नाटकातील शासकीय शाळांचे रुपडे पालटणार
कर्नाटकातील किनारपट्टी भागातील शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. कर्नाटक विधानपरिषदेचे सदस्य मंजुनाथ भांडारी यांनी ग्रामीण भागातील शाळांची अवस्था लक्षात घेऊन हा मुद्दा पुढे आणला होता. विद्यार्थ्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा…