वायुसेनेच्या मेहर बाबा स्पर्धेची नोंदणी सुरू
भारतीय वायुसेनेने ‘मेहर बाबा’ स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीसाठी नोंदणी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली असून, यंदा या स्पर्धेचा मुख्य विषय ‘ड्रोन आधारित निरीक्षण रडारांसाठी सहकार्य’ हा निश्चित करण्यात आला आहे. स्वदेशी मानवरहित विमान म्हणजेच ड्रोन आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या विकासाला वेग देणे, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे….