पांढरा कांदा वसईच्या बाजारात दाखल
वसई तालुक्यातील औषधी गुणधर्मांनी युक्त असा पांढरा कांदा अखेर बाजारपेठेत दाखल झाला असून, ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. यंदा परतीच्या लांबलेल्या पावसामुळे आणि लहरी हवामानामुळे रब्बी हंगामातील या पिकाला तयार होण्यास विलंब झाला. तरीही, शेतकऱ्यांनी आता कांद्याच्या आकर्षक माळा तयार करून त्या विक्रीसाठी आठवडी बाजारात…