कोकणात एकसष्ठ दिवस मासेमारी बंद
मासळीच्या नैसर्गिक प्रजनन काळात राज्य शासनाने कोकण किनारपट्टीवर पावसाळी यांत्रिक मासेमारी बंदी लागू केली आहे. येत्या १ जूनपासून ते ३१ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना समुद्रात जाऊन मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सलग एकसष्ठ दिवस लागू राहणाऱ्या या महत्त्वपूर्ण बंदीचे…